Mumbai Police : मुंबई पोलीस दलात मोठे फेरबदल, १८ पोलीस आयुक्तांच्या बदल्या

Mumbai Police transfer : पोलीस विभागातील १६२ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता मुंबई पोलीस दलातील पोलीस आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
mumbai police
mumbai police Saam tv
Published On

Mumbai Police Officers :

आगामी लोकसभा निवडणूक आणि बोरीवली गोळीबार प्रकरणानंतर मुंबई पोलीस विभाग सतर्क झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस दलात मोठे फेरबदल केल्याचे समोर आले आहे. या आधी पोलीस विभागातील १६२ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता मुंबई पोलीस दलातील पोलीस आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलीस दलातील १८ पोलीस आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. परिमंडळ १० चे डीसीपी दत्ता नलावडे यांची गुन्हे शाखेत बदली तर त्यांच्या जागी मंगेश शिंदे यांना जबाबदारी देण्यात आली आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

परिमंडळ ९ चे डीसीपी कृष्णकांत उपाध्याय यांच्याकडे परिमंडळ ३ ची जबाबदारी तर राजतिलक रोशन यांना परिमंडळ ९ चे पोलीस उप आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

तेजस्वी सातपुते या परिमंडळ ५ च्या नव्या डीसीपी होणार आहेत. तर रागसुधा आर यांच्याकडे अंमलबजावणी शाखेची जबाबदारी देण्यात आली आहे.

विशाल ठाकूर यांच्याकडे गुन्हे शाखेच्या प्रकटीकरण १ ची जबाबदारी तर शाम घुगे यांच्याकडे अमली पदार्थ विरोधी पथकाची सूत्र देण्यात आली आहे. तर आनंद भोईटे यांच्याकडे परिमंडळ ११ ची जबाबदारी देण्यात आली आहे.

मुंबईत काही दिवसांपूर्वी पोलिसात फेरबदल

सूत्रांच्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी मुंबई पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्याचं वृत्त हाती आलं होतं. मुंबई पोलीस दलातील १ सहाय्यक पोलीस आयुक्त, ६ वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्याचं माहिती मिळाली होती. तसेच बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना तातडीने कार्यमुक्त करावे, असे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकांऱ्यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com