crime news, Nalasopara , Traffic Police SaamTv
मुंबई/पुणे

Crime News : 'मी वकील आहे, तुमची नोकरी खाऊन टाकेन' महिलेस धमकी, दांपत्य अटकेत

या प्रकरणामुळं पाेलिस विभागास धक्का बसला.

चेतन इंगळे

Nalasopara News : वाहतूक महिला पोलिसाच्या अंगावर भरधाव वेगातील दुचाकी घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना नालासोपाऱ्यात (nalasopara) घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या घटनेत महिला पोलिसाच्या (police) हाताला व पायाला दुखापत झाली आहे. नालासोपारा पोलिसांनी सरकारी कामात अडथळा, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून वकील दांपत्याला अटक केली. दरम्यान वकिलाने पोलिसांनी जाणून बुजून आपल्यावर गुन्हा दाखल केल्याचं म्हणणं मांडले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाहतूक महिला पोलीस प्रज्ञा दळवी (३०) या पाटणकर पार्क येथील गोडाऊनवर असताना हा प्रकार घडला आहे. वकील ब्रजेशकुमार भेलौरिया (३१) यांची दुचाकी वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केल्याने टोईंग करून गोडाऊनमध्ये आणली होती.

याच गोष्टींचा राग मनात धरून ते सरकारी जागेत जबरदस्तीने घुसून सरकारी कामात अडथळा निर्माण करून दुचाकी काढून भरधाव वेगाने गोडाऊनच्या मेन गेटवर जोराने आदळली. महिला पोलीस प्रज्ञा यांनी त्यांना थांबविण्यासाठी प्रयत्न केला.

परंतु त्यांनी त्यांच्या अंगावर दुचाकी चढवली. यामुळे त्यांच्या डाव्या पायास, उजव्या हाताला दुखापत झाली. पाेलीसांनी सांगितलं संबंधितांनी महिला पाेलिसांना शिवीगाळ करून मी वकील असून तुमची नोकरी खाऊन टाकेन, तुम्ही रिश्वतखोर असून तुम्हाला आता बघून घेतो अशी धमकी देत लोकांच्या समोर मोठमोठ्या आवाजात पोलिसांची प्रतिमा मलिन केली.

दरम्यान महिला पोलिस यांनी वकील ब्रजेशकुमार भेलौरिया (३१) आणि त्यांची पत्नी डॉली भेलौरिया (३१) यांच्याविरोधात तक्रार दिली. त्यानंतर पाेलीसांनी सरकारी कामात अडथळा व महिला पोलिसांवर भरधाव वेगात दुचाकी घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. तसेच दांपत्याला अटक करण्यात आली असल्याचे विलास सुपे यांनी सांगितले. दरम्यान वकिलाने पोलिसांनी आपल्यावर जाणूनबुजून गुन्हा दाखल केल्याचे सांगितले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Care : ग्लोइंग स्कीनसाठी प्या पपई स्मूदी; जाणून घ्या फायदे

महाराष्ट्राचे आमदार लंडनच्या दौऱ्यावर, कोण कोणत्या नेत्यांचा समावेश, पाहा यादी

Dashank Yog: 30 वर्षांनंतर शनी बनवणार दशांक योग; या राशींच्या तिजोरीत पडणार पैशांचा पाऊस

Nigeria Terror Attack : नरसंहार! रक्ताच्या नद्या वाहिल्या; दहशतवाद्यांनी १६२ जणांना संपवलं, क्रूरतेने जग हादरलं

Maharashtra Live News Update: म्हाडाच्या अंधेरीतील पीएमजीपी कॉलनीत छत कोसळले

SCROLL FOR NEXT