Shiv Sena : 'निवडणूक आयोग कोणाच्या घरचं थाेडीच आहे, निश्चित न्याय मिळेल'

उच्च न्यायालयाच्या निकालाचे काही टेन्शन नाही.
Ambadas Danve , Navi Mumbai
Ambadas Danve , Navi Mumbai saam tv

- सिद्धेश म्हात्रे

Ambadas Danve : या महाराष्ट्रात जे महिशासुर निर्माण झालेले आहेत यांचा नायनाट करण्याची शक्ती निश्चित दुर्गेमध्ये आहे. ती शिवसैनिकांत (shivsainik) आहे. ती शक्ती देवी माताने द्यावी अशी प्रार्थना देवीला केल्याचे विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी नवी मुंबईत (Navi Mumbai) नमूद केले.

विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे हे नवी मुंबई येथे नवरात्राेत्सव मंडळांना भेटी देत आहेत. देवीच्या दर्शनानंतर दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी दानवेंनी विरोधकांना रावणाची उपमा दिली.

Ambadas Danve , Navi Mumbai
Navratri 2022 : गरबा दांडिया खेळण्यास जाणार आहात ? थांबा ! ही बातमी वाचा

दानवे म्हणाले या महाराष्ट्रात जे महिशासुर निर्माण झालेले आहेत यांचा नायनाट करण्याची शक्ती निश्चित दुर्गेमध्ये आहे. ती शक्ती या शक्ती देवतेने द्यावी अशी प्रार्थना देवीला केली आहे. आम्हांला उच्च न्यायालयाच्या निकालाचे काही टेन्शन नाही. ते घेण्याचे गरज नाही कारण फक्त कोर्ट बदललेले आहे असे दानवेंनी नमूद केले.

Ambadas Danve , Navi Mumbai
Supriya Sule : शंभूराज देसाईंच्या 'त्या' वक्तव्यावर सुप्रिया सुळे दुःखी

दानवे म्हणाले निवडणूक आयोग कोणाच्या घरचं नाही, ती एक स्वायत्त संस्था आहे. निश्चित तिथे सुद्धा आम्हांला न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त केला. नवरात्रीमध्ये दहा दिवस दुर्गेची पूजा केली जाते. दहाव्या दिवशी रावणाचा दहन केलं जाते. जे या शक्ति देवतेच्या विरोधात आहेत ती रावणाचीच प्रतिमा आहे. शक्ती देवता ही आम जनतेची आहे, शिवसेनेची आहे, बाळासाहेबांची आहे, उद्धव ठाकरे यांची आहे. यांच्या विरोधात जे लढतायत ते रावण आहेत. त्यांचे दहन हाेईल असेही दानवेंनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Ambadas Danve , Navi Mumbai
TuljaBhavani : खासदार अमाेल काेल्हेंचे तुळजाभवानीस साकडं, म्हणाले...,

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com