- अमर घटारे
Dandiya : कोरोना नंतर यंदा नवरात्र उत्सव धुमधडाक्यात साजरा होत आहे. अमरावती शहरात ५३ ठिकाणी गरबा दांडीयाचे कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमांना सेलेब्रिटी येण्याची शक्यता आहे. उत्सव शांततेत पार पडावा यासाठी अमरावती शहरात पाेलीसांचा (police) कडेकाेट बंदाेबस्त आहे. (amravati navratri latest marathi news)
अमरावती शहरातील बहुतांश ठिकाणी गरबाच्या कार्यक्रमांना सेलेब्रिटी येण्याची शक्यता असल्याने त्या ठिकाणी गर्दी होऊन अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गरबा दांडियाच्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा लावण्याचे आदेश पोलीस आयुक्त आरती सिंग (ips arti singh) यांनी दिले आहेत.
अमरावती शहरातील गरबा, दांडिया कार्यक्रमांना आयाेजकांनी गरबा, दांडिया खेळण्यासाठी येणा-यांना आधार कार्ड दाखवल्या शिवाय प्रवेश देऊ नये अशी सूचनाही पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी केली आहे. गरबा झाल्यानंतर पोलीस बंदोबस्तात महिला घरी पोलीस सोडतील. तसेच अनुचित प्रकार घडू नये यासाठी १५०० पेक्षा अधिक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे असेही सिंग यांनी नमूद केले. एकंदरीत अमरावतीत नवरात्र उत्सव साजरा करताना कडक नियमावली लागू करण्यात आली आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.