Kalyan Crime News Saam tv
मुंबई/पुणे

Kalyan Crime News: अल्पवयीन मैत्रिणीला भेटण्याच्या बहाण्याने घरी बोलावून सामूहिक अत्याचार; घटनेनं कल्याण हादरलं

अल्पवयीन मैत्रिणीला घरी बोलावून चार मित्रांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे.

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख

Kalyan News: कल्याणमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मैत्रिणीला घरी बोलावून चार मित्रांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच घटना घडली आहे. या प्रकरणी कोळशेवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणमध्ये चार मित्रांनी अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कल्याणमधून ही घटना समोर आली आहे.

याप्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकणात तीन तरुणांना अटक केली आहे. तर एक अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे. साहिल,सुजल, विजय अशी तीन आरोपींची नावे आहेत.

नेमकं काय घडलं?

सदर पीडित मुलगी ही कल्याण परिसरात राहते. सदर पीडित मुलीला तिचा मित्र साहिल हा दोन दिवसांपूर्वी भेटला. 'माझी प्रेयसी तुझ्यामुळे माझ्यावर संशय घेते, आपल्यात काही नाही हे स्पष्ट करू. तू उल्हासनगरला घरी ये, असं अल्पवयीन मुलीला साहिलने सांगितलं.

त्यानंतर या पीडितेला साहिल गाडीवर बसवून उल्हासनगरला घेऊन गेला. घरी गेल्यावर त्याने पीडितेवर अत्याचार केला. घडलेल्या या घटनेमुळे पीडित मुलगी घाबरली. त्यानंतर ती आपल्या मैत्रिणीच्या घरी निघून गेली.

साहिलने पुन्हा फोन करून तिला दुसऱ्या दिवशी घरी बोलावलं. यावेळी साहिलचे तीन मित्र देखील होते. या तिघांनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला.

याप्रकरणी पीडितेने कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार पोलिसांनी साहिल, सुजल, विजय या तिघांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. तर एका अल्पवयीन आरोपीची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जिमला जाण्याची गरज नाही! खुर्चीवर बसून करा 'हे' 5 योगा, पोटावरची चरबी होईल कमी

Washim Flood : मुसळधार पावसाने कांचन नदीला पूर, रस्ते वाहतूक पूर्णपणे बंद; शेकडो हेक्टर शेतीचे नुकसान

Maharashtra News Live Update: उद्या सकाळी ११ नंतर नसरापूर प्रकरणात न्यायालय शिक्षा सुनावणार

Papaya Eating Benefits: पपई खाल्ल्याने वजन खरंच कमी होते का? जाणून घ्या रोज पपई खाण्याचे ७ जबरदस्त फायदे

भाजप खासदारांना कार्यक्रमातच चक्कर, तातडीने रुग्णालयात दाखल; माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्ष भेटीसाठी हॉस्पिटलमध्ये

SCROLL FOR NEXT