Crime News: आई म्हणावं की वैरिणी! 2 वर्षाच्या मुलीवर आधी चाकूने वार, मग काळीज काढून खाल्लं; किंचाळ्या ऐकून शेजारी हक्का-बक्का

Marathi Crime News: या घटने मागचं कारण जाणून तर तुम्हाला आणखीच धक्का बसेल.
Crime News
Crime News Saam Tv
Published On

Kenya Crime News: गेल्या काही दिवसांपासून देशात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मारहाण, हत्या, अपहरण अशा अनेक घटना सातत्याने समोर येत राहतात. अशातच आता आणखी एक हादरवणारी घटना समोर आली आहे. या घटनेत आईनेच पोटच्या २ वर्षीय मुलीची चाकूने भोसकून हत्या केली इतकेच नाही तर तिचे काळीज काढून खाल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. (Latest Marathi News)

Crime News
Pune Fight News: शिल्लक राहिलेल्या गुलाबजामवरून नातेवाइक अन् केटरर्समध्ये तुफान राडा; भर मांडवातच हाणामारी

ज्याला जन्म दिला, त्याच मुलाला मारून त्याचं काळीज खाण्याचा विचारही कोणी करू शकत नाही. मात्र या आईने हे सगळं केलं. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या घटने मागचं कारण जाणून तर तुम्हाला आणखीच धक्का बसेल. ही घटना केनिया येथील असल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकणी २४ वर्षीय ऑलिव्हिया नसेरियनला अटक करण्यात आली. आपल्या 2 वर्षाच्या मुलीची तिने चाकूने भोसकून हत्या केल्याचा आरोप आहे. इतकेच नाही तर ऑलिव्हियाने या चिमुकलीच्या शरीराचे तुकडे केले आणि तिचे काळीज खाल्ले. मिळालेल्या माहितीनुसार, शेजारच्या अनेक लोकांनी खिडकीतून हे भीषण हत्याकांड पाहिले. ते म्हणतात की या वेड्या आईने आपल्या मुलीला अनेक वेळा भजन गाताना आणि वाचताना पाहिलं होतं. त्यामुळे तिला राग अनावर झाला. (Crime News)

Crime News
Mumbai Crime: धक्कादायक! राहत्या घरात आढळला महिला उपनिरीक्षकाचा मृतदेह; गेल्या दीड वर्षापासून...

मुलीच्या किंचाळ्या ऐकून लोकांना धक्का बसला. ही महिला आपल्या मुलीचे अवयव कापून खात होती. मुलीला वाचवण्यासाठी शेजाऱ्यांनी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत मुलीचा मृत्यू झाला होता. महिलाही कपड्यांशिवाय तिथेच बेशुद्ध अवस्थेत पडली होती. हे पाहून स्थानिकांनी तत्काळ पोलिसांना (Police) माहिती दिली. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु असून न्यायालयाने तिला 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com