अनैतिक संबंधातून झालेले बाळ रेल्वेत ठेवून जाणाऱ्या आईला पोलिसांनी ठोकल्या बेड्या प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

अनैतिक संबंधातून झालेले बाळ रेल्वेत ठेवून जाणाऱ्या आईला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

रेल्वेमध्ये एका पिशवीत नवजात बाळाला ठेवून पळ काढणाऱ्या महिलेला आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे.

प्रदीप भणगे

कल्याण : टिटवाला रेल्वे स्थानकामध्ये 20 नोव्हेंबर रोजी रेल्वेमध्ये एका पिशवीत नवजात बाळ आढळून आलं होतं. कल्याण GRP ने या प्रकरणी भादवी कलम 317 प्रमाणे गुन्हा दाखल करत तपास सुरू केला होता जीआरपी पोलीसांसह कल्याण रेल्वे क्राईम ब्रांचही (Railway Crime Branch) या गुन्ह्याचा तपास करीत होती.

हे देखील पहा -

हा तपास करत असताना क्राईम ब्रांचने सर्व स्थानकातील CCTV तपासले असता कोपर रेल्वे स्टेशनमध्ये (Koper Railway Station) एक महिलाबसली होती. तिच्या हातामध्ये एक पिशवी होती. ज्या पिशवीमध्ये ते बाळ सापडले ती पिशवी आणि महिलेच्या हातातील पिशवी सारखीच दिसून आल्याने तिच महिला आरोपी असावी असा संशय पोलिसांना आला दरम्यान पोलिसांनी तपास केला.

त्या महिलेचा पत्ता शोधून काढत कल्याण रेल्वे क्राईम ब्रांचचे महिले सोबत तिच्या प्रियकराला ताब्यात घेतले महिलेकडे विचारपूस केली असता पोलिसांच्या माहितीनुसार या महिलेचे एका विवाहिती पुरुषासोबत संबंध होते. यांच्या दोघांमधील अनैतिक संबंधामुळे तिने बाळाला जन्म दिला. आणि ते बाळ नकोसे झाल्याने तिने बाळाला रेल्वेमध्ये सोडले होते. यात तिच्या प्रियकरांचाही समावेश होता पोलिसांनी आता या दोघांना देखील बेडय़ा ठोकल्या आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

October Heat : 'ऑक्टोबर हीट'चा तडाखा! मुंबई-कोकणाला उष्णतेचा येलो अलर्ट, तुमच्या शहरात काय स्थिती?

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

SCROLL FOR NEXT