PMPML issues strict new rules for drivers and conductors to prevent accidents in Pune saam tv
मुंबई/पुणे

फोनवर बोलणं, गाणं ऐकणं नकोच! PMPML च्या कंडक्टर- ड्रायव्हरसाठी नवे नियम

PMPML conductor and driver rules for traffic Safety : अपघातांमध्ये वाढ झाल्यानंतर पीएमपीएमएलने बस चालक आणि वाहकांसाठी कडक नियम लागू केले आहेत. पुण्यातील सार्वजनिक वाहतुकीत प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी फोन बंदी करण्यात आलीय.

Bharat Jadhav

  • PMPML ने अपघात टाळण्यासाठी नवे नियम लागू केले.

  • चालक आणि कंडक्टरना फोनवर बोलणं व गाणी ऐकणं बंदी घालण्यात आली.

  • नियम वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने लागू करण्यात आले आहेत.

  • PMPML संचालक मंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

मागील काही दिवसांपासून PMPML बसेसच्या अपघाताचं प्रमाण वाढलंय. चालकांच्या हलगर्जीपणामुळे अपघात घडत असल्याचं समोर आल्यानंतर नवीन नियम प्रणाली लागू करण्यात आलीय. पीएमपीएमएलच्या चालक आणि कंडक्टर चालक आणि कंडक्टरांना हे नियम लागू करण्यात आले आहेत. पीएमपीएमएलच्या संचालक मंडळाच्या बैठकीत वाहतूक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नियम लागू करण्याचे निर्णय घेण्यात आलाय. (No Phones or Music PMPML Implements Strict Safety Guidelines)

चालकांना ड्रायव्हिंग करताना मोबाईल-हेडफोन वापरास बंदी घालण्यात आलीय. महत्त्वाचे म्हणजे चालकांचे मोबाईल ड्युटी संपेपर्यंत आता कंडक्टरला सांभाळावं लागणार आहे. गेल्या काही दिवसांपासून PMPML बसेसच्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे. चालकांच्या निष्काळजीपणामुळे या दुर्घटना होताना दिसत आहेत.

त्यामुळेच बसचालकांच्या आणि कंडक्टर यांच्या संदर्भात PMPML प्रशासनाकडून मोठा निर्णय घेतलाय. ड्रायव्हिंग करताना मोबाईल-हेडफोन वापरास बंदी घालण्यात आलीय.या नियमाचे उल्लंघन केल्यास थेट निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेत.

सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नियम लागू

पीएमपीचे चालक सिग्नल जम्पिंग, भरधाव वेगाने बस चालविणे, झेंब्रा क्रॉसिंगवर बस थांबवणे, मोबाईल फोनवर बोलत बस चालवणे अशा विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन होत आहे. काही चालक तर कानाला हेडफोन लावून बस चालवत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या PMPML कडे आल्या आहेत.

नवे नियम काय आहेत?

बस चालवताना चालकांना त्यांचे फोन कंडक्टरकडे द्यावे लागतील.

शिफ्ट संपेपर्यंत हे मोबाईल चालकांना मिळणार नाहीत.

नियमांचे पालन न केल्यास चालकांचे तात्काळ निलंबन होणार

हा आदेश PMPML अंतर्गत कार्यरत खाजगी बस कंत्राटदारांवर हा नियम लागू राहणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election Commission: निवडणुका स्थगित करा; राज ठाकरे, उद्धव ठाकरेंसह विरोधकांची मागणी, काय आहे कारण?

NCP MLA Sunil Shelke: 'मी जादूटोणा करतो, EVM हॅक करतो', राष्ट्रवादीच्या आमदाराकडून ईव्हीएम वश

Election Commission of India: मतदार यादीत घोळ, आयोगाची वेबसाईट कोण हँडल करतंय? वडेट्टीवारांचा आरोप

Maharashtra Politics: शरद पवार यांना धक्का! पक्षफुटीनंतरही साथ न सोडणाऱ्या निष्ठावंत नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Fact Check: दिवाळीत अंबानींकडून 'फ्री गोल्ड'; सोन्याची चेन मोफत देण्याची घोषणा? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

SCROLL FOR NEXT