pmc play musical band in front of property tax violators houses saam tv
मुंबई/पुणे

पुणेकरांनो ! थकीत मिळकत कर भरा अन्यथा घरासमोर वाजेल बँड (पाहा व्हिडिओ)

Pune Municipal Corporation : पुण्यातील अनेक मालमत्ताधारकांनी अद्याप मिळतकर भरलेला नसल्याने पुणे महापालिकेचे वसूली पथक थकबाकीदारांच्या मिळकती सील करीत आहे.

Siddharth Latkar

- अक्षय बडवे

Pune News :

पुणे महापालिकेने (pune municipal corporation) थकीत मालमत्ता कर (property tax) वसूल करण्यासाठी भन्नाट आयडिया काढली आहे. बड्यांसह छाेट्या थकबाकीदारांच्या मिळकत कराच्या वसूलीसाठी त्यांच्या घरासमाेर महापालिकेचे वसूली पथक बँड वाजवत आहे. यामुळे थकीत रक्कम जमा हाेत असल्याचा अनुभव पुणे महापालिका वसूली पथकास येत आहे. (Maharashtra News)

पुणे महापालिकेने सोमवारपासून शहरात पाच पथकांच्या माध्यमातून बँड वाजवून थकबाकी वसूल करायला सुरुवात केली आहे. आत्तापर्यंत 1900 कोटी रुपयांची वसुली झालेली आहे. हे आर्थिक वर्ष संपण्यासाठी सव्वा महिना शिल्लक असताना प्रशासनापुढं आणखी 400 कोटी रुपये वसूल करण्याचे आव्हान आहे.

दरम्यान थकबाकीदारांच्या घरासमाेर बॅंड वाजू लागल्याने अनेक मिळकतधारक स्वत:हून थकीत मालमत्ता कर महापालिकेकडे जमा करु लागल्याचे चित्र आहे. पुणे महापालिकेच्या या भन्नाट आयडियाची शहरातील चाैका-चाैकात चर्चा सुरु आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! नवले पुलाजवळ भरधाव कंटेनरने अनेक वाहनांना उडवलं, ४ जणांचा मृत्यू

Black Dark Lips: ओठांवरचा काळपटपणा कसा दूर कराल? या जादुई टिप्स वाचा

काँग्रेस उमेदवाराची कमाल, डिपॉझिट म्हणून चिल्लर भरली; निवडणूक अधिकारीही चक्रावले|VIDEO

Maharashtra Live News Update: पुणे -बंगळुरू महामार्गावर भयंकर अपघात, कंटेनरची एकमेकांना धडक

Yami Gautam: कॉन्ट्रास्ट फॅशनचा नवा ट्रेंड, कश्मिरी ब्यूटी यामी गौतमचा पिंक ड्रेस लूक व्हायरल, पाहा PHOTO

SCROLL FOR NEXT