PM Narendra Modi Maharashtra tour :  Saam tv
मुंबई/पुणे

PM Narendra Modi Maharashtra Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्या महाराष्ट्र दौरा, कसा असेल संपूर्ण दौऱ्याचा कार्यक्रम

PM Narendra Modi to inaugurate Vadhavan Port : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत. या संपूर्ण नियोजित दौऱ्याविषयी माहिती जाणून घेऊयात.

Vishal Gangurde

पालघर : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यानिमित्त पंतप्रधान मोदी उद्या मुंबई आणि पालघर या ठिकाणी कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. मुंबईत एका खासगी कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्या शुक्रवारी पालघरमध्ये वाढवण बंदराच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पालघरमध्ये वाढवण बंदराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी जिल्हा प्रशासन आणि जेएनपीएकडून सभा मंडप उभारण्याचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. साधारणतः 40 ते 45 हजार लोक बसतील, इतक्या भव्य स्वरूपात हा सभा मंडप उभारण्यात येत आहे. हा सभा मंडप उभारताना प्रशासनाची चांगलीच दमछाक झालेली पाहायला मिळत आहे.

मागील दहा दिवसांपासून पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या सभा मंडप ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चिखल आहे. या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी अवघे काही तास शिल्लक असल्याने प्रशासनाची चांगली तारांबळ उडालेली पाहायला मिळते. पालघरच्या सिडको मैदानाजवळ हा सभा मंडप उभारण्याचं काम सध्या प्रशासनाकडून हाती घेण्यात आलं आहे. या ठिकाणी कोकणपरिक्षेत्रातून 5000 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले आहेत.

कसा असेल दौरा?

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या शुक्रवारी महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत. महाराष्ट्रात पंतप्रधान मोदींचे मुंबई आणि पालघर असे दोन कार्यक्रम असणार आहेत. पंतप्रधान मोदींचे 11 वाजता मुंबईत आगमन होईल. त्यानंतर त्यांचा ११.३० वाजता बीकेसी जिओमध्ये खासगी कार्यक्रम असणार आहे. त्यानंतर ते १२ वाजता पालघरकडे रवाना होतील. पुढे पंतप्रधान मोदींच्या हस्ते १ वाजता पालघरमध्ये वाढवणं बंदराचं भूमिपूजन होईल.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पालघरमधील वाढवन बंदराचं उद्या भूमिपूजन होणार आहे. या संदर्भात केंद्रीय बंदर विकास मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या बंदराच्या माध्यमातून बारा लाख लोकांना रोजगार मिळणार असल्याचा दावा सोनोवाल यांनी केला.

वाढवण बंदर हे राज्य आणि देशाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. या बंदरामुळे पर्यावरणाला कोणताही धोका नसल्याचा दावा देखील केंद्रीय मंत्र्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या होणाऱ्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला राज्याचे राज्यपाल , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह केंद्रातील आणि राज्यातील बडे मंत्री उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Quick easy tilgul recipe: मकर संक्रांतीसाठी घरीच बनवा झटपट तीळगूळ, वाचा सोपी पद्धत

Maharashtra Live News Update: पूजा खेडकर यांच्या बंगल्यावर दरोडा प्रकरण, मुंब्रातून एकाला अटक

Success Story: आर्थिक परिस्थिती बेताची, वडील दूध विकायचे, लेकीने एकदा नव्हे तर दोनदा केली क्रॅक; IAS अनुराधा पाल यांचा प्रवास

प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आदित्य आणि राज ठाकरेंची भेट, नेमकी काय चर्चा झाली? VIDEO

बदलापुरात मोठा राडा; भाजप कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला, कार्यालयही फोडलं, VIDEO

SCROLL FOR NEXT