PM Modi First Foreign Tour: Twitter/ ANI
मुंबई/पुणे

PM Modi Pune Visit: PM मोदींचा पुणे दौरा! शहरातील विविध ठिकाणे पार्किंगसाठी आरक्षित, खासगी उड्डाणांवरही बंदी; वाचा सविस्तर

PM Narendra Modi Pune Visit Schedule: अति महत्वाच्या व्यक्तींची सुरक्षा तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ६५ अन्वये प्राप्त अधिकारानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश जारी केले आहेत.

Gangappa Pujari

सचिन जाधव, पुणे|ता. २५ सप्टेंबर

Latest Pune News Updates in Marathi: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी (ता. २६ सप्टेंबर) पुणे दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुणे शहरातील विविध विकासकामांचे उद्घाटन, नियोजित कार्यक्रम तसेच एसपी कॉलेजवर जाहीर सभा होणार आहे. पंतप्रधानांच्या या नियोजित पुणे दौऱ्याच्या कार्यक्रमास जिल्ह्यातून मोठ्या संख्येने नागरिक पुणे शहरात येण्याची शक्यता आहे. त्यामुळेच शहरातील विविध ठिकाणच्या जागा वाहनांच्या पार्किंगसाठी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. जिल्हादंडाधिकारी यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २६ सप्टेंबर २०२४ रोजीच्या नियोजित पुणे दौऱ्याच्या निमित्ताने पुणे शहरातील विविध ठिकाणच्या जागा वाहनांच्या पार्किंगसाठी अधिग्रहित करण्यात आल्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुहास दिवसे यांनी जारी केले आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अति महत्वाच्या व्यक्तींची सुरक्षा तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ६५ अन्वये प्राप्त अधिकारानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश जारी केले आहेत.

या आदेशानुसार पुणे शहरातील नदीपात्र भिडे पूल, पाटील प्लाझा, न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड, डी. पी. रोड म्हात्रे पुलाजवळ, न्यू इंग्लिश स्कूल रमनबाग, हरजीवन हॉस्पीटल सावरकर चौक, पीएमपीएल मैदान पूरम चौक, निलायम टॉकीज, विमलाताई गरवारे शाळा, आबासाहेब गरवारे महाविद्यालय, कटारिया माध्यमिक शाळा, मिनर्व्हा पार्किंग मंडई व हमालवाडा पार्किंग या ठिकाणच्या जागा अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी २५ सप्टेंबर रोजी पहाटेपासून ते २६ सप्टेंबर रोजी रात्री २४.०० वाजेपर्यंत पुणे व पिंपरी-चिंचवड शहर तसेच पुणे ग्रामीण जिल्ह्यात पॅराग्लायडींग, हॉट बलुन सफारी, ड्रोन, मायक्रोलाईट एअरोप्लेन आदी प्रकारच्या खासगी अवकाश उड्डाणांना मनाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यानी जारी केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya: सोमवारपासून या ३ राशींचे नशीब चमकणार, पैसा अन् प्रेमाचा वर्षाव होणार

Maharashtra Live News Update: शेतकऱ्याने घेतले तहसील कार्यालयातच विष; प्रकृती गंभीर

Soft Idli Recipe: इडली फुगतच नाही? बॅटरमध्ये घाला '१' पदार्थ, सॉफ्ट - साऊथ स्टाईल इडलीचं सिक्रेट

BSNL Prepaid Plan: स्वस्तात दमदार ऑफर! बीएसएनएलच्या 225 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळवा दररोज 2.5GB डेटा आणि अनेक फायदे

Rule Change : १ ऑक्टोबरपासून ५ नियम बदलणार, तुमच्या खिशावर होणार परिणाम, वाचा काय होणार बदल

SCROLL FOR NEXT