PM Narendra Modi Pune Visit at start Opposition Congress workers are aggressive  Saam TV
मुंबई/पुणे

PM Modi Pune Visit: पंतप्रधान मोदींचं पुण्यात आगमन, काँग्रेसने दाखवले काळे झेंडे; पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड

PM Modi's Pune Visit Latest News: पंतप्रधान मोदी पुण्यात दाखल होताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध केला.

Satish Daud

PM Modi's Pune Visit Latest News: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (१ ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर आहेत. सकाळी ११ वाजेच्या सुमारास त्यांचं पुणे विमानतळावर आगमन झालं. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह राज्यपाल रमेश बैस यांनी त्यांचं स्वागत केलं. दरम्यान, पंतप्रधान मोदी पुण्यात दाखल होताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध केला.

यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं. यामुळे काही काळ शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, पोलिसांनी वेळीच आंदोलकांना ताब्यात घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

दुसरीकडे इंडिया फ्रंट पुणेकडून सुद्धा पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याला विरोध करण्यात आला. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली इंडिया फ्रंटच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आंदोलनास सुरूवात केली होती. एकूण २६ पक्ष आणि संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. पोलिसांची मात्र, आंदोलकांची धरपकड करताना मोठी फजिती झाली.

दरम्यान, पुण्यात आगमन झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतलं. यावेळी मोदींनी बाप्पाचा अभिषेकही केला. पंतप्रधान मोदी दगडूशेठ मंदिर परिसरात येताच भाजपा तसेच शिवसेना कार्यकर्त्यांनी मोदींच्या नावाने घोषणा दिल्या. यामुळे संपूर्ण परिसरात दणाणून केला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्यानंतर ते एसपी कॉलेज येथे पुरस्कार प्रदान सोहळ्याला उपस्थित राहतील. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देखील उपस्थित राहणार आहेत.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Madison Square Garden: न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर 'भारत माता की जय' आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमलं

Maharashtra Rain Live News : तीन दिवसानंतर मुंबईत आता पावसाची विश्रांती

Nandurbar : बस कंडक्टरकडून विद्यार्थिनींना शिवीगाळ; नंदुरबार बसस्थानकावरील प्रकार, कारवाईची मागणी

Beed : सरकारी वकिलाने कोर्टातच केली आत्महत्या, बीडमध्ये खळबळ

Diabetic patients: पांढरा भात खाल्ल्याने शरीरातील ब्लड शुगरचं काय होतं? मधुमेही रूग्णांनी भात खावा की नाही?

SCROLL FOR NEXT