PM Modi Inaugurate Atal Setu Eknath Shinde Speech Saamtv
मुंबई/पुणे

Eknath Shinde Speech: पंतप्रधान मोदींच्या समोरच CM एकनाथ शिंदेंनी दिला मोठा शब्द

PM Modi Inaugurate Atal Setu: पंतप्रधान मोदींच्या हस्ते देशातील सर्वात लांब सागरी सेतू शिवडी-न्हावाशिवा पुलाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आदी नेते या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित आहेत

Gangappa Pujari

CM Eknath Shinde Speech:

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींच्या हस्ते देशातील सर्वात लांब सागरी सेतू शिवडी-न्हावाशिवा पुलाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आदी नेते या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित आहेत. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदींवर स्तुतीसुमने उधळली. तसेच आगामी लोकसभा निवडणूकीत महायुतीला घवघवीत यश मिळणार असल्याचा विश्वासही यावेळी व्यक्त केला.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

"आज 22 किलोमीटरचा सी ब्रीज सुरु झाला आणि त्याचा शुभारंभ पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) केला. या सेतूचे भूमिपूजनही आदरणीय मोदींजींनी केले होते आणि शुभारंभ देखील त्यांनी केला आहे. हा प्रकल्प गेमचेंजर आहे.." असे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यावेळी म्हणाले.

लोकसभा निवडणुकीनंतर भूकंप..

"तसेच यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला. " अटल सागरी सेतू भूकंपातही सुरक्षित राहिल, इतका मजबूत आहे. पण लोकसभा निवडणुकीनंतर (Loksabha Election 2024) भूकंप येईल आणि आमचे विरोधक तो सहन करू शकणार नाहीत.." असा टोलाही मुख्यमंत्री शिंदेंनी यावेळी लगावला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अबकी बार ४५ पार ...

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये महायुतीला देशात आणि राज्यात मोठे यश मिळणार असल्याचा विश्वासही व्यक्त केला. "मोदींजीं एवढे प्रेम देशात कुणालाच मिळत नाही. हेच विरोधकांना खटकतं, त्यांच्या पोटात दुखतं. असं मुख्यमंत्री म्हणाले. तसेच अबकी बार 400 पार हा नारा मजबूत करायचा आहे. 'अबकी बार मोदी सरकार आणि राज्यात अबकी बार 45 पार...' अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.(Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT