PM Narendra Modi Pune Visit Meets Sharad Pawar Maharashtra Politics  Saam TV
मुंबई/पुणे

PM Modi Meets Sharad Pawar: पंतप्रधान मोदींच्या पाठीवर शरद पवारांकडून कौतुकाची थाप; व्यासपीठावर रंगला हास्यविनोद

PM Narendra Modi Meets Sharad Pawar: पुरस्कारासाठी मोदी व्यासपीठावर दाखल झाले. यावेळी शरद पवार आणि पंतप्रधान मोदींमध्ये हास्यविनोद रंगला जो कॅमेऱ्याने अचूकपणे टिपला.

Satish Daud

PM Narendra Modi Meets Sharad Pawar: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुणे विमानतळावर दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं.

विमानतळावरून मोदी थेट दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी गेले. यावेळी त्यांनी बाप्पाचा अभिषेकही केला. दरम्यान, शरद पवार आणि पंतप्रधान मोदी या दोन बड्यांमध्ये भेट झाली. यावेळी पवारांनी मोदींच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज लोकमान्य टिळक पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. महत्वाची बाब म्हणजे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते पंतप्रधान मोदींना हा पुरस्कार दिला जात आहे. दरम्यान, पुरस्कारासाठी मोदी व्यासपीठावर दाखल झाले. यावेळी शरद पवार आणि पंतप्रधान मोदींमध्ये हास्यविनोद रंगला जो कॅमेऱ्याने अचूकपणे टिपला.

व्यासपीठावर पोचताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांसोबत हस्तांदोलन केलं. यावेळी शरद पवार आणि मोदींमध्ये काहीतरी गोष्टीवरून हास्यविनोद रंगला. यावेळी शरद पवार यांनी हसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. दोन बड्या नेत्यांमध्ये रंगलेला हा हास्यविनोद कॅमेऱ्याने अचूक टिपला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्यासपीठावर येण्याआधी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, रोहित टिळक उपस्थित होते. दरम्यान, काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी मात्र, पंतप्रधान मोदी यांच्या पुणे दौऱ्याला विरोध केला.

आधी मणिपूरला जा आणि मगच पुण्याला या असं म्हणत कार्यकर्त्यांनी आंदोलन देखील केलं. पंतप्रधान मोदी पुण्यात दाखल होताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध केला. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं. यामुळे काही काळ शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, पोलिसांनी वेळीच आंदोलकांना ताब्यात घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: १२ हजार पुरुषांनी लाटले लाडकीचे पैसे, सरकारला लावला १६२ कोटींचा चुना, RTI मधून धक्कायदाक माहिती समोर

Actor Passes Away: पडद्यावरचा व्हिलन काळाच्या आड, प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र-तेलंगनाचा संपर्क तुटला; सीमेवरील पोडसा पूल पाण्याखाली

Nanded: साखरझोपेत आभाळ फाटलं; ६ गावांना पुराचा वेढा, ४०-५० म्हशींचा मृत्यू, थराराक VIDEO

Balasaheb Thorat : काही शक्तींकडून संगमनेरची संस्कृती बिघडवण्याचे काम; बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT