PM Narendra Modi Saam Tv
मुंबई/पुणे

PM Modi In Thane: मराठी, मेट्रो अन् मविआ; ठाण्यात PM मोदींची विरोधकांवर चौफेर टीका

Satish Kengar

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यांनी आज ठाण्यात विकास कामाचे लोकार्पण केलं. यावेळी बोलताना त्यांनी महाविकस आघाडी आणि काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले आहेत की, ''जिथे जिथे काँग्रेसचे पाऊल पडतं, तिथे सगळं उद्ध्वस्त होतं. काँग्रेसने देशाला गरिबीत ढकललं आहे. यांनी (काँग्रेस) महाराष्ट्र आणि शेतकऱ्यांनाही उद्ध्वस्त केलं. यांनी ज्या राज्यात सरकार स्थापन केली त्यांनाही उद्ध्वस्त केलं. इतकेच नाही, यांच्यासोबत येऊन इतर पक्षही उद्ध्वस्त होतात.''

'केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला'

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ''केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. हा केवळ मराठी आणि महाराष्ट्राचा सन्मान नसून ज्या परंपरेने या देशाला ज्ञान, तत्त्वज्ञान, अध्यात्म आणि साहित्याची समृद्ध संस्कृती दिली आहे, त्याचा हा सन्मान आहे. त्याबद्दल मी देशातील आणि जगातील मराठी भाषिकांचे अभिनंदन करतो.''

'मुंबई आणि ठाण्याची आधुनिक ओळख होणार'

ते म्हणाले, आज महायुती सरकारने मुंबई एमएमआरमध्ये 33,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे प्रकल्प सुरू केले आहेत. याशिवाय, 12,000 कोटी रुपयांहून अधिक ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो रेल्वेचा पाया रचला गेला आहे. या विकासकामांमुळे मुंबई आणि ठाण्याची आधुनिक ओळख होणार आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, ''बाबासाहेब ठाकरे यांचे ठाण्याशी विशेष आकर्षण होते. हे स्व. आनंद दिघे यांचेही शहर आहे. या शहराने देशाला आनंदीबाई जोशी यांच्यासारखी पहिली महिला डॉक्टर दिली. या विकासकामांच्या माध्यमातून आज आपणही या महान व्यक्तींचा संकल्प पूर्ण करत आहोत. या सर्व विकासकामांसाठी मी महाराष्ट्रातील तमाम जनतेचे अभिनंदन करतो.''

मोदी म्हणाले की, ''देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मुंबईतील मेट्रो लाइन-3 सुरू करण्यात आली होती. यातील 60 टक्के काम त्यांच्या कार्यकाळात झाले, मात्र त्यानंतर महाआघाडीचे सरकार आले. महाविकास आघाडीच्या मंडळींनी मेट्रोचे काम पुढे ढकलले, अडीच वर्षे रखडलेल्या कामामुळे प्रकल्पाचा खर्च 14 हजार कोटींनी वाढला. आज एका बाजूला महाराष्ट्राचा विकास हे आपले ध्येय मानणारे महायुतीचे सरकार आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे लोक आहेत, त्यांना संधी मिळाली की विकासकामे थांबवतात.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : विधानसभेला एकनाथ शिंदेंची कसोटी; यंदा मुख्यमंत्र्यांसमोर आव्हान काय? पाहा व्हिडिओ

Ajit Pawar on Sharad Pawar: 'सून म्हातारी झाली', अजित पवार यांचा नाव न घेता शरद पवारांना टोला; पुन्हा काढलं वय, VIDEO

Suvarna Dhanorkar : लय भारी! सामाजिक भान, साम टीव्हीच्या अँकरचं केशदान...

Rahul Gandhi: आरक्षणाची 50 % मर्यादा वाढवा, शरद पवारांपाठोपाठ राहुल गांधीचीही मागणी; भाजपची होणार कोंडी?

Maharashtra Politics: सेनेची मनसे होणार? उद्धव ठाकरे CM शिंदेंवर मात करणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT