Narendra Modi Speech Saam tv
मुंबई/पुणे

PM Narendra Modi Speech : छत्रपती शिवरायांची माफी ते सावरकरांवरून विरोधकांना सवाल; PM नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील १० ठळक मुद्दे, वाचा

PM Narendra Modi Speech in Wadhwan : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढवण बंदराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमावेळी राज्यातील महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. तसेच यावेळी मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागितली.

Vishal Gangurde

गणेश कवडे, साम टीव्ही प्रतिनिधी

पालघर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पालघर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींच्या हस्ते वाढवण बंदराच्या भूमिपूजन झालं. या ७६ हजार कोटींच्या वाढवण बंदरामुळे १२ हजार रोजगार उपलब्ध होणार असल्याचा दावा केला जात आहे. पंतप्रधान मोदींनी वाढवण बंदराच्या भूमिपूजनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी माफी मागितली. तसे यावेळी पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर टीका केली.

पंतप्रधान मोदी यांच्या भाषणातील मुद्दे

भाजपने मला पंतप्रधानपदाची उमेदवारी दिली. तेव्हा मी सर्वप्रथम रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर जाऊन प्रार्थना केली होती. आराध्य दैवतेसमोर जशी भक्ती करतो. तशी मी माझ्या यात्रेचा आरंभ केला होता.

सिंधुदुर्गमध्ये जे झाले, ते माझ्यासाठी आणि माझ्या सहाकाऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही. आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त राजे नाहीत. आमच्यासाठी ते आराध्य दैवत आहेत.

मी आज डोके झुकवून माझे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी मस्तक ठेवून माफी मागतो. आमचे संस्कार वेगळे आहेत.

आम्ही ते लोक नाहीत. जे दररोज याच भक्तीच्या आड वीर सावरकारांना शिव्या देतात. त्यांचा अपमान करतात. देशवासीयांच्या भावनांना चिरडले जाते.

वीर सावरकर यांचा अपमान केल्यानंतर ते माफी मागत नाहीत. एवढ्या महान व्यक्तींचा अपमान करून माफी मागत नाही. त्यांचे संस्कार महाराष्ट्राची जनता पाहत आहे.

मी आज छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागत आहे. हे आमचे संस्कार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना आपले आराध्य देव मानतात, मी अशा आराध्य देवाची पूजा करणाऱ्या लोकांचीही माफी मागतो. माझे संस्कार वेगळे आहेत.

आमच्यासाठी आराध्य देशापेक्षा मोठे काही नाही. आजचा दिवस विकास यात्रेचा ऐतिहासिक दिवस आहे. विकसित महाराष्ट्र हा विकसित भारत संकल्पनेचा सर्वात मोठा हिस्सा आहे. माझ्या सरकारचा हा तिसरा कार्यकाळ आहे.

महाराष्ट्रासाठी नेहमीच मोठे निर्णय घेतले आहेत. महाराष्ट्राकडे विकासासाठी आवश्यक संसाधन आहेत. येथे समुद्रकिनारा आहे. तेथून आंतरराष्ट्रीय व्यापार व संस्कृती आहे.

महाराष्ट्राला आणि देशासाठी आज वाढवण बंदराचे भूमिपूजन करत आहोत.

७६ हजार कोटींहून अधिक रुपये यासाठी खर्च केले जातील. देशातील सर्वात मोठा कंटेनर बंदर असेल.

जगातील सर्वात खोल बंदरांपैकी एक महत्त्वाचे बंदर हे वाढवण असेल.

एकट्या वाढवण बंदरावर सर्वाधिक आयात निर्यात होईल. औद्योगिक प्रगतीचा हे बंदर केंद्र बनेल. या क्षेत्राची ओळख प्राचीन किल्ल्यातून होत होती.

आता या क्षेत्राची ओळख आधुनिक बंदरांमधूनही होईल. पालघर व महाराष्ट्रातील व देशातील लोकांना मी शुभेच्छा देतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra New DGP : संजय वर्मा राज्याचे नवे पोलीस महासंचालक

Car Driving Tips: कार चावलताना वारंवार झोप येतेय? तर 'या' टिप्स ट्राय करा....

Prajakta Mali: कामातून वेळ काढून तुझ्याकडे येईलच, प्राजक्तानं कुणाला केलं प्रॉमिस?

Sanjay Raut News : लाडकी बहीण योजनेवरून शिंदे - राऊतांमध्ये वार पलटवार, पाहा Video

Beed Vidhan Sabha : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिकिटासाठी शब्द दिला मात्र पूर्ण केला नाही; अनिल जगताप यांनी व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT