बॉलिवूड (Bollywood) अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) आणि अभिनेता कुणाल खेमू यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले. रणदीप हुड्डाचा 'स्वतंत्र वीर सावरकर' (Swatantrya Veer Savarkar Movie) आणि कुणाल खेमूचा 'मडगांव एक्सप्रेस' (Madgaon Express Movie) हे चित्रपट एकाच दिवशी रिलीज झाले. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर एकमेकांना चांगली टक्कर देत आहेत. मडगांव एक्स्प्रेस चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. तर स्वातंत्र वीर सावरकर चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक कमी गर्दी करत आहेत. कमाईच्या बाबतीत मडगांव एक्स्प्रेसने स्वातंत्रवीर सावरकर चित्रपटाला मागे टाकले आहे.
बॉक्स ऑफिसवर दोन्ही चित्रपटांची सुरुवात संथ गतीने झाली. हे दोन्ही चित्रपटांनी पहिल्या दिवशी फारशी कमाई केली नाही. पण हळूहळू मडगांव एक्स्प्रेस चित्रपटाने वेग धरला. बॉक्स ऑफिसवर मडगांव एक्स्प्रेस सुसाट चालली असून तिने रणदीप हुड्डाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाला मागे टाकले आहे. याशिवाय 'योद्धा', 'शैतान' आणि 'आर्टिकल 370' हे चित्रपट देखील थिएटरमध्ये अजूनही सुरू आहेत. त्यामुळे 'मडगांव एक्सप्रेस' आणि 'स्वातंत्र्य वीर सावरकर' चित्रपटाच्या कमाईत फारशी वाढ होताना दिसत नाही.
Sacnilk च्या रिपोर्टनुसार, रणदीप हुडाचा 'स्वातंत्र्य वीर सावरकर' चित्रपट पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर निराशाजनक दिसत आहे. मात्र, गुरुवारी चित्रपटाची कमाई बुधवारच्या तुलनेत चांगली होती. सातव्या दिवशी या चित्रपटाने 1.15 कोटी रुपयांची कमाई केली. तर सहाव्या दिवशी म्हणजे बुधवारी केवळ 1 कोटी रुपये जमा करण्यात या चित्रपटाला यश मिळाले. आतापर्यंत या चित्रपटाने एकूण 11.35 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाच्या जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, या चित्रपटाने जवळपास 15 कोटी रुपये कमावले आहेत. या चित्रपटाने आतापर्यंत परदेशात 2 कोटींची कमाई केली आहे.
'मडगाव एक्स्प्रेस'ची कमाई रणदीप हुड्डाच्या चित्रपटापेक्षा चांगली झाली आहे. गुरुवारी दोन्ही चित्रपटांची कमाई जवळपास समान आहे. Sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'मडगाव एक्स्प्रेस'ने सातव्या दिवशी म्हणजेच गुरुवारी 1.20 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाने आतापर्यंत 13.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाच्या जगभरातील कलेक्शनवर नजर टाकली तर या चित्रपटाने 18 कोटींच्या जवळपास कमाई केली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.