पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी मुंबईत भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावली. रिझर्व्ह बँकेच्या नव्वदीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे. या कार्यक्रमात बँकिंग क्षेत्रातील प्रगतीविषयी पंतप्रधान मोदींनी माहिती दिली. '२०१४ आधी बँकिंग क्षेत्र डळमळीत होतं, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी केलं.
१. भारतातील बँकिंग क्षेत्राला गती मिळत नव्हती. आम्ही सर्वांनी तिथून सुरुवात केली. आज आपल्या बँकिंग क्षेत्राला मजबूत व्यवस्था मानलं जात आहे.
२. बँकिग क्षेत्र बुडण्याच्या स्थितीत होतं. आज हे क्षेत्र नफ्यात आहे. मागच्या दहा वर्षात मोठा बदल झाला.
३. आपल्या नियमात स्पष्टता असल्याने या क्षेत्रात बदल झाला. कारण आमच्याकडे प्रामाणिकपणा होता.
४. निती चांगली असेल तर परिणाम चांगले मिळतात. आपल्याला त्याचा फायदा मिळाला. आमच्या सरकारने सार्वजनिक बँकिंग व्यवस्था सुधारण्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च केले.
५. आमच्या प्रयत्नात दृढनिश्चय, प्रामाणिक होता. आज देश पाहतोय, दृष्टीकोन चांगली असल्यावर निती चांगली असते. निती चांगली असल्यावर निर्णय चांगला ठरतो. निर्णय योग्य असल्यास परिणाम चांगले मिळतात.
६. मी एवढंच सांगू इच्छितो की, दृष्टीकोन चांगला असेल तर नीती चांगली असते. बँकिंग क्षेत्राच्या बदल हा अभ्यासाचा विषय आहे.
७. भारतात २७ हजारहून अधिक अर्ज, ज्यात ९ लाख कोटींहून अधिक अंडरलाईन डिफॉल्ट होतं. ते आयबीसीमध्ये अॅडिमिशन व्हायच्या आधी त्याचं निराकरण झालं.
८. या नव्या व्यवस्थेचं सामर्थ्य किती जास्त आहे, हे दिसून येतं. बँकेत ग्रॉस एनपीए २०१८ मध्ये ११.१५ टक्केच्या आसपास होता. त्यानंतर २०२३ येईपर्यंत ३ टक्क्यांनी कमी झालं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.