PM Modi Pune Visit  SAAM TV
मुंबई/पुणे

PM Modi Pune Visit Update: PM मोदींनी दर मंगळवारी पुण्यात यावं, हिंदू महासंघाची अजब मागणी; नेमकं काय आहे कारण?

Hindu Mahasangh On Pm Modi Pune Visit: पीएम मोदींच्या या पुणे दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशामध्ये हिंदू महासंघाने मोदींच्या या दौऱ्यावर अजब प्रतिक्रिया दिली आहे.

Priya More

अक्षय बडवे, पुणे

Pune News: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) येत्या १ ऑगस्ट रोजी म्हणजे उद्या पुणे दौऱ्यावर येणार आहेत. पीएम मोदींच्या दौऱ्यानिमित्त पुण्यामध्ये जय्यत तयारी करण्यात येत आहे. यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार (Lokmanya Tilak National Award) पीएम मोदींना जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी ते पुण्यात येत आहेत.

पीएम मोदींच्या या पुणे दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशामध्ये हिंदू महासंघाने मोदींच्या या दौऱ्यावर अजब प्रतिक्रिया दिली आहे. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दर मंगळवारी पुण्यात यावे.', अशी मागणी हिंदू महासंघाने (Hindu Mahasangh) केली आहे.

पीएम मोदी उद्या पुण्यामध्ये येणार आहेत. त्यामुळे पुण्यातील अनेक ठिकाणी पडलेले रस्त्यावरचे खड्डे बुजवण्याचे काम वेगाने सुरु आहे. 'या पार्श्वभूमीवर रस्त्यावरील खड्डे फक्त बुजवलेच जातात असं नाही तर अक्षरशः धुतले पण जातात असे मत हिंदू महासंघाने मांडले आहे. खाकी पोलीस अधिकारीसुद्धा लोकांबरोबर सभ्यपणे वागतात आणि ट्रॅफिक पोलीस कोपऱ्यात नाही तर चक्क रस्त्यावर दिसतात. वाहने कितीही असो ट्रॅफिक जाम होत नाही. म्हणून मोदींनी दर मंगळवारी पुण्यात यावे. अर्ध्या दिवसापर्यंत का होईना अच्छे दिन आल्याचा भास होतो.', असा टोला हिंदू महासंघाचे नेते आनंद दवे यांनी लगावला आहे.

तर पीएम मोदींच्या दौऱ्याच्या दिवशी पुण्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात यावी, अशी मागणी मनसेने केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेने यासंदर्भात शिक्षण आयुक्तांना निवेदन दिले आहे. १ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी असून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे.

उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील पुण्यात आहेत. उद्या होणारे सर्व जाहीर कार्यक्रम शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी होणार असून सकाळच्या सत्रात अनेक प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालय सुरू असतात. यामुळे विद्यार्थी आणि पालकांना त्रास होऊ शकतो. यासाठी शाळांना सुट्टी जाहीर करावी अशी मागणी मनसेने केली आहे. वाहतुक व सुरक्षेच्या दृष्टीने या दिवशी सर्व शाळा सुट्टी जाहीर करणे उचित ठरेल, अशी प्रतिक्रिया मनसेने दिली आहे.

दरम्यान, पीएम मोदी पुणे दौऱ्यादरम्यान सकाळी ११ वाजता दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेणार आहेत. यावेळी मोदींच्या हस्ते दगडूशेठ गणपतीची पूजा आणि आरती करण्यात येणार आहे. ११.४५ वाजता पीएम मोदी टिळक स्मारक येथे लोकमान्य टिळक यांना अभिवादन करतील. त्यानंतर लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचा वितरण सोहळा होईल. या सोहळ्यामध्ये शरद पवारांच्या हस्ते पीएम मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात येईल.

१२.४५ वाजता शिवाजीनगर येथे पीएम मोदी मेट्रो ट्रेनच्या विस्तारित मार्गाला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. त्याच ठिकाणी पुणे महानगर पालिका, पिंपरी चिंचवड महानगर पालिका, पीएमआरडीए या अंतर्गत विकास प्रकल्पांचे लोकार्पण मोदींच्या हस्ते होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : कोल्हापुरात औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार जखमी, घटना कॅमेऱ्यात कैद

Jharkhand Results 2024 : झारखंडमध्ये इंडिया आघाडीची सरशी; हेमंत सोरेन आणि कल्पना यांची जोडी ठरली सुपरहिट

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीसांनी चक्रव्यूह भेदलं! विधानसभा निवडणुकीत विरोधक चारही मुंड्या चीत

Maharashtra Election Result: बारामतीचा दादा 'अजितदादा'! लोकसभेला काका, विधानसभेला पुतण्या

Mahrashtra Election Result : हूश्श! अखेर रोहित पवार विजयी झाले

SCROLL FOR NEXT