No Road In Adivasi Area Nashik अभिजीत सोनावणे
मुंबई/पुणे

Nashik: आदिवासी बांधवांची दुर्दशा; गावात रस्ताच नसल्यानं गरोदर महिलेला झोळीतून नेलं रुग्णालयात

No Road In Adivasi Area Nashik: एका गरोदर महिलेला रुग्णालयात नेण्यासाठी कुटुंबीयांनी ब्लँकेटची झोळी करत पायी चालत त्या महिलेला दवाखान्यात नेलं आहे.

अभिजीत सोनावणे, सामटीव्ही नाशिक

नाशिक: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दिमाखात साजरा होत असतांना नाशिक (Nashik) जिल्ह्यातील आदिवासी भागात मात्र अजूनही पायाभूत सुविधांची वानवा आहे. नाशिकमधल्या अनेक भागातील आदिवासी बांधव पायाभूत सोयी सुविधांपासून वंचित आहेत.

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर हेतपाडा येथे रस्ताच (Road) नसल्याने रुग्णांना झोळीत न्यावं लागत आहे. एका गरोदर महिलेला रुग्णालयात नेण्यासाठी कुटुंबीयांनी ब्लँकेटची झोळी करत पायी चालत त्या महिलेला दवाखान्यात नेलं आहे. (Nashik Latest News)

हे देखील पाहा -

नाशिकच्या हेतपाडा येथील ग्रामस्थांकडून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. रस्ता नसल्याने या भागात तीन वर्षांपूर्वी सर्प दंश झाल्यानंतर एका १७ वर्षीय मुलीचा मृत्यूही झाल्याचं ग्रामस्थांच म्हणणं आहे. प्रशासनाकडून व्हिडिओची सत्यता पडताळून दखल घेण्याची गरज आहे.

या पूर्वीही रस्त्याच्या समस्या दाखवणारे अनेक व्हिडिओ आणि फोटोज समोर आले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा दुर्गम भागातील कुयलीडाबर गावात रस्ता नसल्याने गरोदर मातेला प्रसूतीकरिता डोंगरदऱ्यातून बांबूची झोळी करुन जीवघेणा प्रवास करत असल्याचा धक्कादायक (Nandurbar News) प्रकार समोर आला होता. स्वांतत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही रस्ता नाही म्हणून हे चित्र असेल तर ते दुर्दैवच आहे. रस्त्याअभावी आरोग्य, शिक्षण, मूलभूत सुविधांपासून आदिवासी बांधवांना वंचित राहावे लागत आहे. आता सदर गावांना दळणवळणाच्या सोयीसाठी चांगला रस्ता कधी तयार होणार याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागून आहे.

आदिवासी दिनाला मुख्यमंत्री काय म्हणाले होते?

दरम्यान आदिवासी समाजाच्या विकासासाठी आर्थिक वर्ष 2022 - 23 मध्ये ११ हजार १९९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आदिवासी बांधवांना शैक्षणिक,सामाजिक,आर्थिक विकास करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ९ऑगस्टला जागतिक आदिवासी दिनानिमित्त जाहीर केलं होतं. जागतिक आदिवासी दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे पालघर जिल्ह्यातील आदिवासी बांधवाना संबोधित केले. त्यावेळी ते बोलत होते.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT