Pimpari Chinchwad Crime Saam Tv
मुंबई/पुणे

Shocking: पिंपरीमध्ये आणखी एका 'वैष्णवी'चा हुंडाबळी, दुचाकी अन् ५ लाखांसाठी छळ; दीड वर्षाचं बाळ पोरकं

Pimpari Chinchwad Crime: पिंपरी-चिंचवडमध्ये विवाहितेने सासरच्यांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. वैष्णवी हगवणे प्रकरणासारखीच ही घटना घडली. माहेरून ५ लाख रुपये आणि दुचाकी आणण्यासाठी या विवाहितेचा छळ होत होता.

Priya More

गोपाळ मोटघरे, पिंपरी-चिंचवड

पुण्यातल्या पिंपरी-चिंचवडमधील तरुणी वैष्णवी हगवणेने हुंड्यासाठी सासरच्यांकडून होत असलेल्या छळाला कंटाळून आत्महत्या केली होती. याच पिंपरी- चिंचवडमध्ये वैष्णवी हगवणे प्रकरणासारखीच आणखी एक घटना समोर आली आहे. हुंड्यासाठी सासरच्यांकडून होत असलेल्या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना पिंपरी-चिंचवडच्या बोऱ्हाडेवाडी येथे घडली आहे. सतत होत असलेल्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून विवाहितेने टोकाचे पाऊल उचलले. या प्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी एकाला अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ लाख रुपये हुंड्याच्या जाचासाठी तसेच दुचाकीच्या मागणीसाठी किरण आशिष दामोदर या २६ वर्षांच्या विवाहित महिलेने गळफास घेत आत्महत्या केली. किरणला तिचा पती आशिष आणि त्याचे कुटुंबीय हुंड्यासाठी सतत छळ करत होते. किरण आणि आशिषला दीड वर्षांचा मुलगा आहे. दारुडा नवऱ्याकडून किरणला सतत मारहाण आणि हुंड्यासाठी छळ होत होता. १७ जुलैच्या मध्यरात्री बोऱ्हाडेवाडी येथील ए डी बॅडमॅन बॅडमिंटन अकॅडमी येथील आपल्या राहत्या घरात किरणने गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं. किरणने आत्महत्या करण्यापूर्वी तिचा पती आशिषने तिला बेदम अमानुष मारहाण केली होती असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे.

किरणचा पती आशिष दामोदर हा तिला सतत दारू पिऊन शिवीगाळ आणि मारहाण करत होता. तसेच तिला त्याच्या व्यवसायासाठी माहेरून ५ लाख रुपये आण असा तगादा लावत होता. याच सर्व त्रासाला कंटाळून शेवटी किरणने गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणात किरणचे वडील संजय हरीभाऊ दोड यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यामध्ये आशिष दीपक दामोदर, त्याची आई सुनंदा दीपक दामोदर, वडील दीपक तुकाराम दामोदर यांच्याविरोधात हुंडाबळी कायदा आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

एमआयडीसी भोसरी पोलिसांनी किरणचा नवरा आशिष दीपक दामोदरला बेड्या ठोकल्या आहेत. तर त्याची आई सुनंदा आणि वडील दीपक हे फरार असून त्याचा पोलिस शोध घेत आहेत. या प्रकरणात आम्ही सर्व कायदेशीर कार्यवाही पूर्ण केली असल्याने आम्ही माध्यमांना कॅमेरा समोर बोलणार नाही, अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली. तर किरणला आत्महत्येस भाग पाडणाऱ्या आशिष दामोदरवर योग्य कायदेशीर कारवाई करून त्याला कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी किरणच्या कुटुंबीयांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News: मराठी तरुणीला मारहाण करणाऱ्या परप्रांतीय तरुणाला अटक, मनसे कार्यकर्त्यांनी शोधून काढत दिला चोप; पाहा VIDEO

Kalyan News: मराठी तरुणीला मारहाण करणारा परप्रांतीय अट्टल गुन्हेगार; आरोपीच्या शोधासाठी पोलिसांच्या ५ टीम तयार

Maharashtra Politics: ठाकरेंना रोखण्यासाठी फडणवीसांचं मायक्रोप्लॅनिंग,ठाकरेंचा डाव भाजप कसा उलटवणार ?

Beed Crime: वाल्मीक कराड जेलमध्ये... तरी गँग अ‍ॅक्टिव्ह! सहकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल, आमदारांना धमक्या आणि शिवीगाळ|VIDEO

Mumbai Local Train: मुंबई-कसारा लोकल ट्रेनवर दरड कोसळली; दोन प्रवासी जखमी

SCROLL FOR NEXT