pimpri chinchwad traffic police collects fines of over rs 2 crores 73 lakhs from violators in a month saam tv
मुंबई/पुणे

Pimpri Chinchwad: नियम माेडणा-यांवर पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलीसांची करडी नजर, महिनाभरात 2 कोटी 73 लाखांचा दंड

नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत असे आवाहन पाेलीसांनी केले आहे.

गोपाल मोटघरे

Pimpri Chinchwad News :

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 32 हजार 775 वाहन चालकांवर पिंपरी चिंचवड वाहतूक पोलीसांनी दंडात्मक कारवाई करत जवळपास 2 कोटी 73 लाख रुपयांचा दंड लादला आहे. (Maharashtra News)

पाेलीसांनी मोबाईलवर बाेलणा-या 939 वाहन चालकांवर, सिग्नल ताेडणा-या 1728 वाहन चालकांवर, ट्रिपल सीट वाहन चालवणाऱ्या 3559 वाहन चालकांवर तसेच विना हेल्मेट वाहन चालवणाऱ्या 2880 वाहन चालकांवर कारवाई केली आहे.

याबराेबरच सीट बेल्ट न लावलेल्या 2220 चारचाकी वाहन चालकांवर, कळ्या काचा असलेल्या 1390 वाहन चालकांवर, कर्कश आवाज असलेल्या 884 वाहन चालकांवर, वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या 8937 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.

पाेलीसांनी बीआरटी मार्गे मध्ये प्रवेश करणाऱ्या 3229 वाहन चालकांवर, 6372 जड अवजड वाहनांवर आणि रॉंग साईडने वाहन चालवणाऱ्या 607 वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करत 2 कोटी, 72 लाख, 91 हजार, 700 रुपयाचा दंड लादला आहे. ही कारवाई 1 ते 30 नोव्हेंबर या एक महिन्याच्या कालावधीमधील असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satara Famous Food: साताऱ्यातील प्रसिद्ध 5 पदार्थ, एकदा खाल तर खातच राहाल

Maharashtra Live News Update: महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आज वडवणी शहर कडकडीत बंद

Gold Rate Today: सोनं झालं आणखी स्वस्त! १० तोळ्यामागे ८२०० रुपयांची घसरण; वाचा आजचे दर

Maharashtra Politics: शरद पवारांना धक्का बसणार? महत्त्वाच्या बैठकीला ३ आमदारांची दांडी, पक्षात जोरदार चर्चा

White & Pink Guava : गुलाबी आणि सफेद पेरुमध्ये काय फरक असतो? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT