Pimpri-Chinchwad Shock Saam
मुंबई/पुणे

फिनिक्स मॉलमध्ये भयंकर घडलं; IT कर्मचाऱ्याकडून सुरक्षा रक्षक महिलेवर बळजबरी, बलात्काराचा प्रयत्न

Pimpri-Chinchwad Shock: मॉलमधील महिला सुरक्षा रक्षकावर आयटी ऑफिसमधील कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला. प्रोमोशनची भूलथाप देत आरोपीने जबरदस्ती केली.

Bhagyashree Kamble

  • फिनिक्स मिलेनियम मॉलमध्ये महिला सुरक्षा रक्षकावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न

  • आयटी कंपनीत काम करणाऱ्या मनोज कदम नावाच्या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

  • प्रोमोशनच्या आमिषाने महिलेसोबत अश्लील वागणूक करून बलात्काराचा प्रयत्न

  • वाकड पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला

  • परिसरात या घटनेनंतर खळबळ उडाली

गोपाळ मोटघरे, साम टिव्ही

पिंपरी चिंचवडमधील वाकड येथील फिनिक्स मिलेनियम मॉलमध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. मॉलमधील सुरक्षा रक्षक महिलेवर आयटी कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला. प्रोमोशनची भूलथाप देत त्यानं महिलेवर जबरदस्ती केली. या प्रकरणी महिलेनं वाकड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

फिनिक्स मिलेनियम मॉलमध्ये महिला खासगी कंपनीत सुरक्षा रक्षक या पदावर कार्यरत होती. तर, मनोज धोंडीराम कदम असे आरोपीचे नाव असून, ते आयटी ऑफिसमधीस कर्मचारी असल्याची माहिती आहे.

पीडित महिलेनं पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पीडित महिला आणि आरोपीची ओळख मॉलमध्येच झाली. मात्र, नंतर आरोपीनं महिलेसोबत अश्लील वागणुकीला सुरूवात केली. आरोपीनं महिलेसमोर एक ऑफर ठेवली. 'तुला कोणती पोस्टिंग हवी आहे, मला सांग', असं म्हणत त्यानं महिलेसोबत अश्लील वर्तवणुक केली.

नंतर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. महिलेच्या इच्छेविरोधात लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी पीडित महिलेनं पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच वाकड पोलिसांना सगळी माहिती दिली. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली. तसेच आरोपी कर्मचारी कदम यांच्याविरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

वाकड पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 74, 351 (2), 351 (3) कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : दिल्लीच्या साईभक्ताकडून साईबाबांना दीड लाखांचा चांदीचा मुकुट अर्पण

Accident News : भीषण अपघात! ट्रॉली आणि पिकअपची जोरदार धडक; २ जणांचा जागीच मृत्यू

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! ३० ते ४० अतिरिक्त लोकल धावणार; रेल्वेचा मोठा निर्णय

Hair Conditioner: गणरायाच्या आवडत्या फुलांपासून बनवा घरगुती हेअर कंडिशनर; केस होतील मऊ आणि चमकदार

Misal Pav Recipe: रविवारी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा झणझणीत पुणेरी मिसळ, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT