Pimpri Chinchwad Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Pimpri Chinchwad : तोंड दाबलं अन् फरफटत नेलं, ८५ वर्षीय वृद्धेवर तरुणाकडून लैंगिक अत्याचार, पिंपरी चिंचवडमधील घटना

Pimpri Chinchwad Crime News : पिंपरी चिंचवडच्या हिंजवडी परिसरात एका २३ वर्षीय नराधमाने ८५ वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार केला.

गोपाल मोटघरे

पिंपरी चिंचवडच्या हिंजवडी परिसरात एका २३ वर्षीय नराधमाने ८५ वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार केला. सोमवारी (ता. २३) सायंकाळच्या सुमारास एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये हा संतापजनक प्रकार घडला. यासंदर्भात तक्रार दाखल होताच पोलिसांनी काही तासांच्या आतच आरोपीला बेड्या ठोकल्या. ओम जयचंद पुरी असं अत्याचार करणाऱ्या नराधमाचे नाव आहे.

आरोपी हा मूळ धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील रहिवासी आहे. सध्या तो पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी परिसरात इलेक्ट्रिशियनचे काम करतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित वृद्ध महिला सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास सोसायटीतील पाचव्या मजल्यावरील आपल्या फ्लॅट समोर चालत होती.

त्यावेळी ओम हा इलेक्ट्रिशियनचे काम करण्यासाठी सोसायटीतील एका प्लॅटमध्ये आला होता. दरम्यान, आरोपी पाचव्या मजल्यावर आला असता त्याने वृद्धेला पाहिले. आसपास कुणीही नसल्याची संधी साधत आरोपीने वृद्ध महिलेचे तोंड दाबले. तसेच तिला सहाव्या आणि सातव्या मजल्याच्या जिन्यातील मोकळ्या जागेत फरफटत नेले.

त्यानंतर त्याने द्धेचा गळा दाबून मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता आरोपीने वृद्धेवर लैंगिक अत्याचार केला. जवळपास पाऊण तास हा प्रकार सुरू होता. वृद्धेने प्रतिकार करत आरडाओरड सुरु केल्याने सोसायटीतील रहिवासी बाहेर आले. त्यामुळे आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. दरम्यान, वृद्धेने हा प्रकार तिच्या कुटुंबातील सदस्यांना जाऊन सांगितला.

त्यांनी तातडीने पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सीसीटीव्ही तपासणी केली असता, आरोपी हा सोसायटीच्या कॅमेऱ्यात कैद झाला. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत काही तासांतच त्याला अटक केली. आरोपीला कोर्टात हजर केले असता, न्यायालयाने त्याला शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

Maharashtra Politics : ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का! बड्या नेत्यानं हाती धरलं एकनाथ शिंदेंचं 'धनुष्यबाण'

Crime News: संतापजनक! बेशुद्ध करत महिलेवर बलात्कार; उपचाराच्या बहाण्याने दिलं भूलचं इंजेक्शन,नंतर...

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाला मोठा धक्का, गुहागरमधील नेत्या शिवसेनेत प्रवेश करणार

SCROLL FOR NEXT