Pimpri Chinchwad Firing  Saam tv
मुंबई/पुणे

Pimpri Chinchwad Firing : पिंपरी-चिंचवड पुन्हा हादरलं! फिनिक्स मॉलवर एकाचा गोळीबार; घटना सीसीटीव्हीत कैद, VIDEO

Pimpri Chinchwad Firing update : पिंपरी-चिंचवड पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेने हादरलं आहे. फिनिक्स मॉलवर एकाने गोळीबार केल्याची घटना घडली आहे.

गोपाल मोटघरे

पुणे : जिल्ह्यातील पिंपरी चिंचवडमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. एकीकडे गणेश विसर्जनाच्या धामधुमीत सुरु असताना पिंपरी चिंचवडमध्ये गोळीबाराची घटना घडली. आहे. पिंपरी चिंचवड शहरातील फिनिक्स मॉलच्या गेटवर गोळीबार घटना घडली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड परिसरातील फिनिक्स मॉलच्या गेटवर दिशेने एकाने बंदुकीतून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चारचाकी वाहनामधून येऊन एकाने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या व्यक्तीने केलेला गोळीबार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

नेमकं काय घडलं?

फिनिक्स मॉलजवळ एक व्यक्ती चारचाकी वाहनातून उतरला. त्यानंतर फिनिक्स मॉलच्या गेट नंबर सातच्या दिशेने गोळीबार केला. या गोळीबाराची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मॉलच्या गेट समोर उभं राहून अज्ञात व्यक्ती गोळीबार करताना सीसीटीव्हीत दिसत आहे.

आज मंगळवारी संध्याकाळी अज्ञात व्यक्ती पांढऱ्या रंगाच्या चार चाकी वाहनांमध्ये पसार झाला आहे. सुदैवाने या गोळीबारात कुणीही जखमी झालेला नाही. तरी गणपती विसर्जनाच्या दिवशी मॉलच्या गेटवर गोळीबार झाल्याने पिंपरी चिंचवड शहर हादरलं आहे. अज्ञात व्यक्तीने गोळीबार का केला? हे मात्र अजून स्पष्ट झालेलं नाही. वाकड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून गोळीबार करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध पोलीस युद्ध पातळीवर घेत आहेत.

कोल्हापुरात एकाचा चाकूने भोसकून हत्या

कोल्हापुरात एकाची चाकूने भोकसून हत्या झाल्याची घटना घडली आहे. हातगाडी लावण्यावरून तरुणांवर चाकू हल्ला करण्यात आला. या चाकू हल्ल्यात तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. कोल्हापूरच्या आराम कॉर्नर जवळ ही घटना घडली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bollywood Stories: 86 व्या वर्षीही काम करण्याची वेळ; हॉस्पिटलचा खर्चासाठी भागवण्यासाठी अभिनेत्याची धडपड

हरभजन सिंह यांच्यासह ७ खासदार भाजपात जाणार, वाचा लिस्ट

Maharashtra News Live Update: TCS प्रकरणात सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांनी काम पाहावं, पोलीस आयुक्तांचे सरकारला पत्र

Saturday Horoscope: शनिदेव होणार या ५ राशींवर होणार प्रसन्न, खर्च वाढेल; वाचा शनिवारचे खास राशीभविष्य

Shivali Parab Photos: 'किती दिवस घालणार एकच...' नव्या फोटोशूटमुळे शिवाली परब झाली ट्रोल

SCROLL FOR NEXT