Pune Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Pune Crime News: चारचाकीच्या टपावर बसून तरुणांची स्टंटबाजी; व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Car Stunt Video: हे दोन्ही तरुण फक्त स्टंट करत नाही तर ते अश्लील हावभाव देखील करतात. स्टंटबाजीसाठी हे दोघं मर्सिडीजसारखी आलिशान कार वापरायचे. या गाडीच्या काचाही काळ्या होत्या.

साम टिव्ही ब्युरो

सोनी मगर

Pimpri Chinchwad Crime News:

चारचाकी कारच्या टपावर बसून अश्लील हावभाव करणाऱ्या दोघांना पोलिसांनी चांगलाच इंगा दाखवलाय. स्टंटबाजी करणाऱ्या या दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर कारवाई सुरू आहे.

कारच्या टपावर बसून स्टंटबाजी करतानाचा व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडीयावर व्हायरल होतोय. हे दोन्ही तरुण फक्त स्टंट करत नाही तर ते अश्लील हावभाव देखील करतात. स्टंटबाजीसाठी हे दोघं मर्सिडीजसारखी आलिशान कार वापरायचे. या गाडीच्या काचाही काळ्या होत्या. पुण्याच्या निगडी परिसरात हे दोघं स्टंटबाजी करायचे.

पोलिसांच्या नजेरत हा व्हिडीओ येताच त्यांनी या दोघांचा शोध घेतला. तसेच तात्काळ या दोघांना ताब्यात घेत त्यांच्यावर कारवाई केली. ओंकार कृष्णा मुंडे आणि त्याचा मित्र प्रतिक शिंगटे अशी या दोन तरुणांची नावं आहेत.

स्टंट करण्यासाठी वापरलेली एम.एच-43-आर-7272 क्रमांकाची आलिशान मर्सिडीज कार ही जप्त करण्यात आलीये. तसंच त्यांच्या विरोधात एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशनमध्ये भादवि कलम 279, 336 तसंच मोटार वाहन कायादा कलम.184, 179, 177, प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

या कारवाईनंतर पोलिसांनी स्टंटीबाजी करणाऱ्यांना कडक इशारा दिलाय. गाडी चालवताना वाहतुकीचे सर्वसामान्य नियम पाळणं अत्यंत गरजेच आहे. गाडीच्या टपावर बसून असे जीवघेणं स्टंट करणे हे स्टंट करणाऱ्या तसंच इतरांच्याही जीवावर बेतू शकतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NCMC Card : आजपासून नियम बदलला! 'या' महिलांचा अर्ध्या तिकिटाचा प्रवास बंद; घ्यावे लागणार पूर्ण तिकीट, वाचा सविस्तर

Chutney For Cholesterol: नसांमध्ये घाणेरड्या कोलेस्ट्रॉलचा थर साचतोय? रोजच्या आहारात फक्त 'ही' एक चटणी खा

Maharashtra News Live Update: मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य प्रकरणी गुन्हा दाखल

Black Salt Water Benefits: पाण्यात काळे मीठ टाकून प्यायल्यास शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या!

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप! एकाच झटक्यात २ कोटीहून अधिक मतदार यादीतून बाहेर; ३६ जिल्ह्यातील आकडेवारी पाहा

SCROLL FOR NEXT