pimpri-chinchwad
pimpri-chinchwad  saam tv
मुंबई/पुणे

Pimpri-Chinchwad : शिवरायांवरील वादग्रस्त वक्तव्यावरून वातावरण तापलं; ८ डिसेंबर रोजी पिंपरी चिंचवड शहर बंदची हाक

गोपाल मोटघरे

Pimpri-Chinchwad News : छत्रपती शिवाजी महाराजांवर वारंवार होणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यावरून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलं तापलं आहे. शिवरायांवर करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे. त्यानंतर आता शिवरायांवर होणाऱ्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात उद्या, गुरुवारी पिंपरी चिंचवड शहर पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. (Latest Marathi News)

भाजपा व्यतिरिक्त इतर सर्व संघटनांनी एकत्र येत पिंपरी चिंचवड शहर उद्या दिवसभरासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोशारी तसेच भारतीय जनता पक्षातील काही नेते मंडळी वारंवार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल आक्षेपार्य वक्तव्य करून महाराजांची बदनामी करण्याचा घाट घालत आहेत असा आरोप संघटनेकडून करण्यात येत आहे. याला कुठेतरी आळा बसावा म्हणून उद्या पिंपरी चिंचवड शहरात कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहे.

उद्योग नगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड शहरात उद्या सकाळपासून सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. अत्यावश्यक सेवा सोडून पिंपरी चिंचवड शहर उद्या पूर्णपणे बंद असणार आहे. आता या बंदला कशाप्रकारे प्रतिसाद मिळतो याचे चित्र उद्या, गुरवारी दुपार पर्यंत स्पष्ट होईल.

मुस्लिम संघटनांनी १३ डिसेंबर रोजी दिली पुणे बंदची हाक

शिवरायांवरील वादग्रस्त वक्तव्याचा विरोधात शिवप्रेमी संघटनांनी १३ डिसेंबरला पुणे बंदची हाक दिली गेली आहे. पुण्यात आज शिवजागर बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांविरोधात ही बैठक होती.

पुरोगामी विचाराच्या पक्ष आणि संघटनांकडून आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. भाजप वगळता सर्वपक्ष आणि सर्व शिवप्रेमी संघटना या बैठकीत हजर होत्या. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा एस.एस.पी. एम.एस. शिवाजीनगर येथे बैठक पार पडली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jayant Patil On Ajit Pawar | जयंत पाटील यांचा अजित पवारांवर निशाणा

Baramati News: मतदार आणि निवडणूक कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य सेवा; मतदान केंद्रावर मेडीकल कीटची सुविधा

Ananya Panday Aditya Roy Kapur Breakup : अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांचं ब्रेकअप ?, लग्नाच्या चर्चांदरम्यान नात्यात दुरावा

Today's Marathi News Live : मनसेचे माजी सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांचा ठाकरे गटात प्रवेश

Bajrang Punia: बजरंग पुनियाला मोठा धक्का! डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

SCROLL FOR NEXT