Pune Crime News: पुण्यात भाजपच्या बड्या पदाधिकाऱ्याला लाखोंचा गंडा; अमेरिकेतील क्रिकेट संघात शेअर्सचे आमिष दाखवत फसवणूक

क्रिकेट कौन्सिलकडे २०-२० क्रिकेट प्रकारात संघ मिळवून देतो तसेच क्रिकेट लीग मधील ४० टक्के शेअर्स मिळवून देतो असे आश्वासन दिले होते.
Pune Crime News
Pune Crime NewsSaam TV

Pune Crime News: पुण्यात भाजपच्या एका पदाधिकाऱ्याला लाखोंचा गंडा घालण्यात आला आहे. यूएसए क्रिकेट लीगमध्ये शेअर्स मिळणून देण्याचे आश्वासन देत ही फसवणूक करण्यात आली आहे. यात ५ जणांविरोधा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

भाजप पदाधिकारी आशिष कांटे (४१) यांच्याबरोबर हा फसवणूकीचा प्रकार घडला आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मुंबईतील ५ जण यूएसए क्रिकेट लीगमध्ये शेअर्स मिळवून देऊ, असा प्रस्ताव घेऊन आले होते. ब्रेनस्टॉर्म या कंपनीसून हे पाच जण आल्याची ओळख त्यांनी दाखवली. त्यांनी युएसए क्रिकेट कौन्सिलकडे २०-२० क्रिकेट प्रकारात संघ मिळवून देतो तसेच क्रिकेट लीग मधील ४० टक्के शेअर्स मिळवून देतो असे आश्वासन दिले होते. यासाठी १ कोटी रुपये लागतील असे त्यांनी कांटे यांना सांगितले. तसेच एनओसीसाठी आधीच ५५ लाख रुपये देण्यास सांगितले.

Pune Crime News
BJP : भाजप कार्यकर्त्यावर खूनी हल्ला; रुग्णालयात दाखल, प्रकृती गंभीर

त्यांनी सांगितल्यानुसार कांटे यांनी ५५ लाख रुपये दिले आणि एनओसी घेण्यासाठी अमेरीकेला रवाना झाले. मात्र त्यांना एनओसी प्रमाणपत्र मिळालेच नाही. त्यामुळे त्यांनी आरोपींकडे याविषयी विचारपूस केली. तेव्हा आपली मोठी फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सिराज हुसेन, सौरभ पांडे, वंदना कृष्णा, राशिद खान, विक्रम हुसेन यांच्यावर फसवणुक केल्याची तक्रार दाखल केली आहे.

Pune Crime News
काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांचे CR खराब करणार; गडकरींचा भर सभेत इशारा

साल २०१९ पासून आरोपींनी फसवणुकीचा (Fraud) हा सापळा रचायला सुरूवात केली होती असे पोलिसांनी सांगितले. सदर ५ जणांविरोदात कलम ३४, ४०६, ४२० अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस (Police) पुढील तपास करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com