pimpri chinchwad air pollution very bad mumbai delhi air pollution Latest Updates  Saam TV
मुंबई/पुणे

Air Pollution: पिंपरी-चिंचवड महाराष्ट्रातील सर्वात प्रदूषित शहर, हवेची गुणवत्ता ढासळली; पुण्यात काय परिस्थिती?

Satish Daud

अक्षय बडवे, साम टीव्ही

Pimpri Chinchwad Air Pollution

पुणेकरांसह पिंपरी-चिंचवडकरांचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. दीपावलीत मोठ्या प्रमाणात फटाके फोडल्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील हवा बिघडली आहे. राजधानी दिल्लीनंतर पिंपरी-चिंचवड हे दुसऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर ठरलं आहे. सफरने याबाबतची आकडेवारी सादर केली आहे.

सफरच्या हवा गुणवत्ता निर्देशांकानुसार, पुण्यातील हवेची गुणवत्ता ढासाळली आहे. तर पिंपरी-चिंचवड शहरातील हवेची गुणवत्ता ‘अतिवाईट’ श्रेणीत गेली आहे. त्यामुळे नागरिकांना श्वास घेतना त्रास होणे, दम लागणे अशा आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पिंपरी-चिंचवड (Pimpari Chinchwad), भोसरी, आळंदी, कात्रज अशा काही भागांमधील हवेची गुणवत्ता बिघडल्याचं समोर आलं आहे. हवेची गुणवत्ता ढासाळल्याचं लक्षात येता नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असं आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांकडून करण्यात आलं आहे.

हवेची गुणवत्ता मोजणाऱ्या सफरने सादरल केलेल्या आकडेवारीनुसार, सोमवारी शिवाजीनगरमध्ये (Pune News) ३८२, कोथरूडमध्ये ३५८, कात्रजमध्ये ३५५, हडपसरमध्ये ३३२, पाषाणमध्ये ३१५, लोहगावमध्ये ३८२, पिंपरी चिंचवडमधील भूमकर चौकात ३१३, भोसरीमध्ये ३४२, निगडी ३४१, आळंदी ३१२ प्रदूषणकारी धूलिकणांचे प्रमाण नोंदवण्यात आले.

दरम्यान, वायू प्रदूषण (Air Pollution) रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड आणि पुणे महापालिकेकडून मार्गदर्शक सूचनाही प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. फटाक्यांचा तसेच वाहनांचा धूर, बांधकामे, यामुळेच पुण्यातील हवेची गुणवत्ता खालावली असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

दुसरीकडे मुंबईची हवा देखील मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाली आहे. सोमवारी मालाड येथे अतिवाईट हवेची नोंद करण्यात आली आहे. मालाडमध्ये हवेचा गुणवत्ता निर्देशांक इतका ३०७ नोंदवला गेला. तर कुलाबा २०७, बोरिवली २२३, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील हवेचा गुणवत्ता निर्देशांक २२३ इतका होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT