Pimpari-Chinchwad Accident Saam Tv
मुंबई/पुणे

Accident: फायर ब्रिगेडच्या वाहनाची दुचाकीला धडक, चाकाखाली चिरडून तरुणाचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

Pimpari-Chinchwad Accident: पिंपरी-चिंचवडमध्ये भीषण अपघात झाला. अग्निशमन दलाच्या वाहनाने दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये चाकाखाली चिरडून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.

Priya More

Summary:

  • पिंपरी-चिंचवडमध्ये भयंकर रस्ते अपघात झाला

  • अग्निशमन दलाच्या वाहनाने दुचाकीला धडक दिली

  • चाकाखाली चिरडून तरुणाचा मृत्यू

  • पोलिसांनी अग्निशमन दलाच्या वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला

गोपाळ मोटघरे, पिंपरी-चिंचवड

पिंपरी- चिंचवडमध्ये भीषण अपघातामध्ये एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाच्या वाहनांने दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये अग्निशमन दलाच्या वाहनाच्या चाकाखाली चिरडून तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही अपघाताची थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. या अपघाताचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी- चिंचवड शहरातील रावेत येथे हा अपघात झाला. रावेतमधील ॲडमविले सोसायटीजवळील स्पाइस डेक चायनीज हॉटेलसमोर ही १६ जानेवारीला संध्याकाळी सात वाजताच्या दरम्यान ही घडली. या अपघातात समीर नेहाल खान (वय २८ वर्षे) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. समीर आपल्या साइटवरून त्याच्या घराकडे दुचाकीने जात होता त्याचवेळी अपघातामध्ये त्याचा मृत्यू झाला.

समीर घराकडे जाताना त्याला पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाच्या भरधाव वाहनाने धडक दिली. ही धडक इतकी भयंकर होती की समीर रस्त्यावर पडला. त्यानंतर अग्निशमन दलाच्या वाहनाच्या चाकाखाली तो चिरडला गेला. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या समीरने जागीच प्राण सोडले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत समीरचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

या प्रकरणात एसपी मुरलीधर कुमार यांनी दिलेल्या तक्रारीवरून रावेत पोलिस ठाण्यामध्ये पीएमआरडीएचे अग्निशमन दलाचे वाहन चालक वैभव रमेश कोरडे (वय ३२ वर्षे) याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम आणि मोटर वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सध्या पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shalu Saree Designs : लग्न असो वा पूजा; नेसा 'या' डिझाइनचे सुंदर शालू, पारंपरिक साजमध्ये नवरी दिसेल शोभून

Honeymoon Places : भारतातील 'या' टॉप रोमॅंटिक हनीमून प्सेसेसवर नक्कीच जा

Love Letter: '143 प्रेमपत्र! 'बघितलं मी पहिल्यांदा, जीव अडकला तुझ्यात पहिल्यांदा'

Maharashtra Live News Update: आंबेगावात दोन्ही राष्ट्रवादी वेगवेगळ्या मैदानात?

Kolhapur: कोल्हापूरात काँग्रेस अन् शिंदेसेना एकत्र येणार? सतेज पाटील यांचे सूचक विधान चर्चेत

SCROLL FOR NEXT