Women Police Jump To Indrayani River Saam TV
मुंबई/पुणे

Pimpari Chichwad : इंद्रायणी नदीत उडी मारुन महिला पोलिसाचा आत्महत्येचा प्रयत्न; पुणे पोलीस दलात खळबळ

Women Police Jump To Indrayani River : पिंपरी चिंडवडमधील इंद्रायणी नदीत एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने सदरील वाहून गेली.

गोपाल मोटघरे

पिंपरी चिंडवड : पिंपरी चिंडवडमधील इंद्रायणी नदीत एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने सदरील वाहून गेली. रविवारी (ता. 25) सायंकाळच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. अनुष्का सुहास केदार (वय 20) असं महिला पोलिसाचे नाव आहे. रात्री उशिरापर्यंत आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून महिला पोलिसाचा शोध सुरू होता.

अनुष्का यांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, अनुष्का केदार दिघी येथील लक्ष्मीनगर परिसरातील रहिवासी आहेत. सध्या त्या पुणे पोलीस (Pune Police) दलात कार्यरत आहेत. रविवारी सायंकाळच्या सुमारास त्यांनी अचानक टोकाचे पाऊल उचलत इंद्रायणी नदी पात्रात उडी मारली.

त्यांना उडी मारताना परिरातील काही नागरिकांनी बघितलं. आरडाओरड होताच स्थानिकांनी नदीपात्राच्या दिशेने धाव घेतली. मात्र, पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने अनुष्का वाहून गेल्या होत्या. दरम्यान, महिला पोलिसाने (Women Police) नदीत उडी मारल्याची वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरली.

स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून अनुष्का यांचा शोध सुरू होता. दरम्यान, अनुष्का केदार यांनी इंद्रायणी नदी पात्रात उडी का मारली ? हे अजून स्पष्ट झालं नाही. यासंदर्भातील तपास पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: पालघरमध्ये ठाकरे गटासह बविआला खिंडार; अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

Maharashtra Live News Update: आदिती तटकरेंच्या मतदार संघात शिंदे गटाची ताकद वाढलीपदाधिकाऱ्यांची भावना

Atal Pension Yojana: या सरकारी योजनेत दर महिन्याला मिळते ₹५०००; गुंतवणूकीचं संपूर्ण कॅल्क्युलेशन वाचा

Vaidehi Parshurami Photos: लाल साडीत खुललंं वैदेही परशुरामीचं सौंदर्य, फोटो पाहा

Vande Bharat Train : मोठी बातमी! देशात आणखी ४ वंदे भारत ट्रेन सेवेत, जाणून घ्या तुमच्या शहरातून धावणार का?

SCROLL FOR NEXT