Pimpari Chinchwad  Saamtv
मुंबई/पुणे

Pimpari Chinchwad Crime: किरकोळ वादातून तरुणाची हत्या; रस्त्यावरील फिरस्ती व्यक्तीमुळे झाला भयंकर गुन्ह्याचा उलगडा; प्रकरण काय?

Pimpari Chinchwad News: रस्त्यावर फिरणाऱ्या एका फिरस्त्या व्यक्तीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे वाकड पोलिसांनी एका ड्रायव्हरच्या खुनाचा छडा लावला आहे.

गोपाल मोटघरे

Pimpari Chinchwad Crime News:

अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपीचा शोध घेणे, तपास करणे आणि गंभीर प्रकरणाचा छडा लावताना पोलिसांचीही चांगलीच कसोटी लागते. सबळ पुरावे नसल्याने तपास करताना अनेक आव्हाने पोलिसांसमोर येतात. अशावेळी पोलीस अनेक शक्कल लढवत शिताफीने प्रकरण तडीस नेतात. असेच प्रकरण वाकडमधून समोर आले आहे. रस्त्यावर फिरणाऱ्या एका फिरस्त्या व्यक्तीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे वाकड पोलिसांनी एका ड्रायव्हरच्या खुनाचा छडा लावला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

२ डिसेंबर २०२३ रोजी योगेश जगन्नाथ सुर्वे या वाहन चालकाला काळेवाडी परिसरातील गजानन नगर परिसरात बेदम मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आल होते. त्यानंतर 6 डिसेंबरला योगेश सुर्वे यांचा ससून रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. योगेश सुर्वेची बायकोदेखील त्याला सोडून गेल्याने तो मिसिंग असल्याची तक्रार ही पोलिसांकडे कोणी दिली नव्हती.

त्यामुळे मृतदेहाची ओळख पटवून त्याच्या मारेकर्‍याला शोधण्याचे मोठ आव्हान वाकड पोलिसांसमोर होते. या खुनाचा तपास करत असताना वाकड पोलिसांनी गजानन नगर परिसरातील काही नागरिकांना योगेश सुर्वेचा फोटो दाखवून विचारपूस केली. त्यावेळी रस्त्यावर फिरणाऱ्या एका फिरत्या व्यक्तीने त्याला ओळखत असल्याची माहिती दिली. त्यानंतर पुढे केलेल्या तपासात वाकड पोलिसांनी योगेश सूर्वे च्या मारेकर्‍याला बेड्या ठोकल्या आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

का करण्यात हत्या?

अनिकेत उर्फ सनी रमेश काळे असं योगेश सुर्वेच्या खून करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. योगेश सुर्वे याने सनी काळेला शिवीगाळ केली होती. त्यामुळे त्यांच्यात किरकोळ भांडण झाले होतं. या भांडणातूनच सनी काळेने योगेश सुर्वेला जबर मारहाण करत त्याची हत्या केली.

मारहाण केल्यानंतर सनी काळे हा मुंबईला पसार झाला होता. मात्रा वाकड पोलिसांनी अतिशय कौशल्य पूर्ण तपास करून सनीच्या मारेकर्‍याला बेड्या ठोकल्या असून त्याचे विरोधात वाकड पोलीस स्टेशन मध्ये भादवी 302 कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nag Panchami: नागपंचमीला चुकूनही 'ही' कामे करु नका

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून गोदावरी पत्रात पाण्याचा विसर्ग वाढवला

Shocking News : संतापजनक! राजकीय वाद टोकाला, महिला मध्यरात्री उठली अन्...

Mithila Palkar: मिथिला पालकरचं वय वाढतय अन् सौंदर्यही खुलतय...

Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील सातही आरोपींची नावं समोर; कोकेन-गांजा, १० मोबईल अन् २ कार जप्त

SCROLL FOR NEXT