Bhandara News: धक्कादायक! भंडारा नर्सिंग महाविद्यालयातील ५० विद्यार्थिनींची प्रकृती बिघडली; अन्नातून विषबाधा झाल्याची शंका

Bhandara Latest News: भंडारा शहारातील शासकिय नर्सिंग वसतिगृहातील ५० पेक्षा अधिक विद्यार्थिनींची प्रकृती अचानक बिघडल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या मुलींना अन्नातून विषबाधा झाली असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
Bhandara Latest News
Bhandara Latest NewsSaamtv
Published On

शुभम देशमुख, भंडारा| ता. ९ डिसेंबर २०२३

Bhandara Breaking News:

भंडारा शहारातील शासकिय नर्सिंग वसतिगृहातील ५० पेक्षा अधिक विद्यार्थिनींची प्रकृती अचानक बिघडल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या मुलींना अन्नातून विषबाधा झाली असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. हॉस्टेल प्रशासनाने मात्र विषबाधा झाली नसल्याचा दावा केला आहे. (Bhandara News Update)

भंडारा शहरात (Bhandara) शासकिय नर्सिंग वसतिगृह आहे. शुक्रवारी (८, डिसेंबर) रात्री अचानक एका पाठोपाठ एक मुलींची प्रकृती बिघडल्याने एकच खळबळ उडाली. या मुलींना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तसेच रात्रीच त्यांच्या पालकांना याबाबत फोनद्वारे कळविण्यात आले.

अचानक मुलींची प्रकृती बिघडली असल्याचे ऐकून पालकही घाबरुन गेले. मुलींना अन्नातून विषबाधा (Food Poisoing) झाल्याने प्रकृती बिघडल्याची शक्यता पालकांनी वर्तविली आहे. तर दुसरीकडे मुली राहत असलेल्या वसतिगृहामध्ये अस्वच्छता असल्याची तक्रारही पालकांनी केली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Bhandara Latest News
Lalit Patil Narcotics Case: अमली पदार्थ तस्करीप्रकरणी मोठी अपडेट, ललित पाटीलसह चार जणांना १० दिवसांची पोलीस कोठडी

मात्र या मुलींना वायरल फीवर असल्याचे जिल्हा शल्य चिकीत्सकांचे म्हणणे आहे. धक्कादायक बाब म्हणजे वसतिगृह प्रशासनाने मुलींना कॅमेरा समोर बोलण्यास मज्जाव केला आहे. दरम्यान, एकाच वेळी 50 विद्यार्थीनीची प्रकृती कशी खालावली हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. तर आता मुलींवर उपचार सुरू असून मुलींची प्रकृती स्थिर आहे. (Latest Marathi News)

Bhandara Latest News
Water Shortage In Shahapur : शहापूर तालुक्यात विहिर अधिग्रहणचे प्रस्ताव पडलेत धुळखात, महिलांची पाण्यासाठी भटकंती

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com