Child abuse private school at Alandi Saam Tv
मुंबई/पुणे

Pimpari Chinchwad Crime: आळंदी हादरली! २ अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार, खासगी शिक्षण संस्थेतील धक्कादायक प्रकार

Child abuse private school at Alandi: आळंदीतील एका खासगी आध्यात्मिक शिक्षण संस्थेत २ अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Priya More

गोपाळ मोटघरे, पिंपरी-चिंचवड

आळंदीत दोन अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आळंदीतील एका खासगी शिक्षण संस्थेत हा प्रकार घडला आहे. शनिवारी मध्यरात्री हा प्रकार घडला आहे. १२ वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आले. या घटनेमुळे आळंदीमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आळंदी पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. सध्या पोलिसांकडून तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आळंदीतील एका खासगी आध्यात्मिक शिक्षण संस्थेत अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. पाहुणा म्हणून आलेल्या एका २८ वर्ंषाच्या आरोपीने या शिक्षण संस्थेमध्ये शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार केले. १२ वर्षांच्या दोन मुलांवर आरोपीने अनैसर्गिक अत्याचार केले. शनिवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास ही घटना घडली.

अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करणाऱ्या महेश नामदेव मिसाळ मामा आणि त्याच्या बहिणीविरोधत आळंदी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या दोघांवर पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी महेश नामदेव मिसाळ मामा या आरोपीला आळंदी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आळंदी पोलिस सध्या या घटनेचा अधिक तपास करत आहे.

या घटनेमुळे आळंदीमध्ये खळबळ उडाली आहे. या खासगी आध्यात्मिक शिक्षण संस्थेत शिकणाऱ्या मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेप्रकरणी स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सध्या दोन्ही मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT