Physical abuse of married woman doctor in Mumbai accused arrested by Gamdevi police Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: धक्कादायक! मुंबईत महिला डॉक्टरवर बलात्कार; गावदेवी पोलिसांत गुन्हा, नराधमाला अटक

Mumbai Crime News: खाजगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत एका ३८ वर्षीय नराधमाने डॉक्टर महिलेवर वारंवार बलात्कार केला.

Satish Daud

Mumbai Women Doctor Rape Case

खाजगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत एका ३८ वर्षीय नराधमाने डॉक्टर महिलेवर वारंवार बलात्कार केला. इतकंच नाही, तर आरोपीने ब्लॅकमेल करून महिलेकडून लाखो रुपये देखील उकळले. ही संतापजनक घटना मुंबईच्या गावदेवी परिसरात घडली. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि आरोपीची ओळख एका क्लबमध्ये बँटमिंटन खेळताना झाली होती. कालांतराने दोघांमध्ये मैत्री झाली. पीडित महिलेचे तिच्या पतीसोबत नेहमी वाद होते. मी दोघांमधील वाद मिटवून देतो, असं म्हणत आरोपीने पीडितेला विश्वासात घेतलं.

२० ऑगस्ट रोजी आरोपीने पीडितेला एका क्लबमध्ये बोलावले. दरम्यान, क्लबमध्ये गेल्यानंतर आरोपीने पीडितेला जबरदस्तीने (Crime News) दारू पाजली. आरोपी इतक्यावरच थांबला नाही, तर त्याने पीडितेला कारमधून आपल्या घरी नेले. तिथे गेल्यानंतर तिच्यावर बलात्कार केला.

यादरम्यान आरोपीने पीडितेचे अश्लिल व्हिडीओ देखील काढले. ते व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार बलात्कार केला. याच व्हिडीओचा आधार घेऊन आरोपीने पीडितेकडून पैसे देखील उकळले.

दरम्यान, दिवसेंदिवस आरोपीचे कृत्य वाढत असल्याने पीडितेने अखेर पोलिसांत (Police) धाव घेतली. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून गावदेवी पोलिसांनी आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक देखील केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: बारामतीमध्ये अजित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष करायला सुरुवात

South Indian Star : दाक्षिणात्य कलाकारांना मुंबईची भुरळ, रश्मिका मंदानासह 'या' सेलिब्रिटींनी घेतले आलिशान फ्लॅट

Maharashtra Election Results : बाळासाहेब थोरात, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार पिछाडीवर, टॉप १० मतदारसंघातल्या लढतीत काय स्थिती

Healthy Breakfast: नाश्त्यासाठी बनवा कमी साहित्याचा 'हा' पौष्टीक पदार्थ

Chopda Vidhan Sabha : निवडणुकीचे काम टाळणाऱ्या २१ कर्मचाऱ्यांवर गुन्हा; विनापरवानगी राहिले गैरहजर

SCROLL FOR NEXT