Ajit Pawar Photo in NCP Office Saam TV
मुंबई/पुणे

Ajit Pawar Photo in NCP Office : राष्ट्रवादीच्या पुणे कार्यालयातून अजित पवारांचे फोटो हटवले, जयंत पाटलांनी घेतली जागा

NCP Political News : शरद पवारांनी अजित पवार गटाला त्यांचे फोटो न वापरण्याचेही आदेश दिले होते.

Dnyaneshwar Choutmal

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर पक्ष आणि पक्षचिन्ह कुणाचं यावरुन वाद सुरु झाला आहे. निवडणूक आयोगात आता हे प्रकरण गेलं आहे. दरम्यान पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयातून मोठी अपडेट समोर आली आहे.

पुणे राष्ट्रवादीच्या कार्यालयातून अजित पवार यांचे फोटो हटवण्यात आले आहेत. अजित पवार यांच्या जागी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचे फोटो लावण्यात आले आहेत.

शरद पवारांनी अजित पवार गटाला त्यांचे फोटो न वापरण्याचेही आदेश दिले होते. त्यानंतर आता शरद पवार गटाने अजित पवारांचे देखील फोटो हटवले आहे. याआधी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचाही फोटो दिल्लीतील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यालयातून हटवण्यात आला होता. (Latest Marathi News)

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची कायदेशील लढाई आता सुरु झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या गटाला व अजित पवार गटाला नोटीस पाठवली आहे. अजित पवारांच्या गटाने दाखल केलेल्या याचिकेवर ही नोटीस पाठवण्यात आली आहे. (Political News)

राष्ट्रवादीतील फुटीनंतर दोन्ही गटांकडून पक्षावर दावा केला जात आहे. या दाव्यांनुसार कायदेशीर दस्तावेज सादर करावेत, असं निवडणूक आयोगाने म्हटल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भाजपने आणीबाणीलाही मागे टाकले, आशुतोष रांकांचा गंभीर आरोप

Fresh Flowers : पूजेची फुले लगेच वाळतात? 'ही' १ सोपी ट्रिक वापरा, आठवडाभर राहतील ताजी तवानी

CJP Protest: खरी लढाई तर आता सुरू, सीजेपी नेते आंदोलनावर ठाम; थेट पंतप्रधानांवर केले गंभीर आरोप

Navratri Horoscope : नवरात्रीत ग्रहांची स्थिती बदलणार नशीब! कोणत्या राशींचे भाग्य उजळणार? कुंभ राशीपासून या राशींच्या व्यक्तींचे अडथळे होणार दूर

Nana Patekar: नाना पाटेकरांना हार्ट अटॅक कशामुळे आला? पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून सत्य आलं समोर?

SCROLL FOR NEXT