Phone tapping case filed against IPS Rashmi Shukla; What exactly is the case? Read more ... Saam Tv
मुंबई/पुणे

IPS Rashmi Shukla: फोन टॅपिंग IPS रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल; नेमकं काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर...

IPS Rashmi Shukla: रश्मी शुक्ला यांना राज्य सरकार निलंबित करणार का? फोन टॅपिंग रश्मी शुक्ला यांच्याविरोधात बंडगार्डन पोलिसात गुन्हा दाखल...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे: पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त आणि सध्याच्या CRPF च्या महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या विरोधात पुण्यात बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग (Phone Tapping) केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसात (Bundgarden Police Station) गुन्हा (Crime) दाखल झाला आहे. राज्यातील अनेक महत्वाच्या राजकीय लोकांचे फोन टॅपींग करुन गोपनीय माहीती उघड केल्याप्रकरणी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यानंतर दुसऱ्या बड्या अधिकाऱ्यावर महाविकास आघाडी सरकारकडून कारवाई करण्यात आहे. (Phone tapping case filed against IPS Rashmi Shukla; What exactly is the case? Read more ...)

हे देखील पहा -

राज्याचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर गुन्हा दखल झाल्यावर त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले होते, त्यानंतर रश्मी शुक्ला यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रश्मी शुक्ला आयपीएस अधिकारी असून त्यांनी पदाचा दुरुपयोग करत राज्य सरकारची गोपनीय माहिती लिक केली असा आरोप त्यांच्यावर आहे. परमवीर सिंग यांच्यानंतर दुसऱ्या आयपीएस अधिकारी विरोधात महाविकास आघाडी सरकारची ही मोठी कारवाई आहे.

काय आहे नेमकं प्रकरण:

राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त डॉ. रशी शुक्ला यांच्यावर अनेक गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. रश्मी शुक्ला या राज्य गुप्त वार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त पदावर कार्यरत होत्या. सध्या त्या केंद्रीय प्रतिनियुक्तीवर हैद्राबाद येथे कार्यरत आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये घोटाळ्याचा आरोप करत सभागृहात अहवालदेखील वाचून दाखवला होता. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर रश्मी शुक्ला यांच्याकडूनच माहिती लीक झाल्याचे समोर आले होते. त्यांनंतर त्यांनी आपण महाराष्ट्र सरकारच्या परवानगीनेच फोन कॉल्स टॅप केल्याचे सांगत आपली बाजू मांडली.

रश्मी शुक्ला या भाजपसाठी काम करत असल्याचा आरोप

दहशतवादी प्रकरणांच्या तपासासाठी फोन टॅपिंगची परवानगी दिली होती, पण त्यात महाविकास आघाडी सरकारच्याही मंत्र्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला. याबाबत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत रश्मी शुक्लांवर अनेक आरोप करत रश्मी शुक्ला या भाजपसाठी काम करत असल्याचा आरोप केला होता. मे 2021 मध्ये मुंबई सायबर सेलच्या टीमने हैदराबादमधील घरी जाऊन शुक्ला यांचा जबाब नोंदवला होता, या जबाबात शुक्ला यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप हे फेटाळून लावले होते.

दरेकरांची टिका:

रश्मी शुक्ला यांच्याबाबत कारवाई करुन सरकार सुडाचे राजकारण करत असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला आहे. ते म्हणाले की, सरकारने परमबीर सिंह यांच्यावर कारवाई केली, आता रश्मी शुक्ला यांच्यावर कारवाई केली जात आहे. सरकारच्या अडचणीत वाढ होत असतांना ही सुडाची कारवाई केली जात आहे अशी टिका दरेकरांनी केली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT