petrol pumps Maharashtra AI
मुंबई/पुणे

Petrol Price : पेट्रोलच्या किंमती वाढल्या, गॅस सिलिंडरनंतर पॉवर पेट्रोल महागलं, वाचा पुण्यातील ताजे दर

petrol pumps Maharashtra : पुणे आणि मुंबईत पॉवर व स्पीड पेट्रोलच्या दरात २.०९ रुपयांची वाढ झाली असून महागाईचा फटका बसण्याची शक्यता आहे. गॅस सिलिंडरनंतर आता इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार का? जाणून घ्या सविस्तर.

Akshay Badve

Petrol prices hiked in Pune Mumbai : आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे (War) देशात पुन्हा एकदा महागाईचा (Inflation) भडका उडाला आहे. पुण्यासह मुंबई आणि राज्यातील महत्त्वाच्या शहरांत पेट्रोलचे दर वाढले आहेत. पेट्रोलच्या दरात प्रति लिटरमागे २.०९ रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. पण थांबा, ही वाढ साध्या पेट्रोलमध्ये (Normal petrol) झालेली नाही, तर स्पीड (Speed) आणि पॉवर पेट्रोलच्या (Power petrol) दरात वाढ झालेली आहे. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात घरगुती (Domestic) आणि व्यावसायिक (Commercial) गॅस सिलिंडरच्या दराचा भडका उडाला होता. यातून लोक सावरत नाहीत, तोच आता पेट्रोलचे दर वाढले आहेत. (petrol price hike in Pune today power petrol rate)

पुण्यामध्ये मध्यरात्रीपासून पेट्रोलच्या दरात बदल झाले आहेत. साध्या पेट्रोलच्या किंमती स्थिर (Stable) आहेत, पण स्पीड आणि पॉवर पेट्रोलच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झालेली आहे. प्रत्येक लिटरमागे २.०९ रुपयांनी दर वाढल्याची नोंद करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात आता स्पीड पेट्रोल आणि पॉवर पेट्रोलची किंमत ११३.७७ रुपये इतकी झाली आहे. गुरुवारी १११.६८ रुपये इतकी किंमत स्पीड आणि पॉवर पेट्रोलची होती. दोन्ही प्रकारच्या पेट्रोलची दरवाढ आजपासून लागू (Effective) करण्यात आली आहे.

साध्या पेट्रोलचे दर सध्या स्थिर आहेत. पण प्रीमियम पेट्रोलच्या किमतींनी सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार आहे. पुण्यामध्ये स्पीड आणि पॉवर पेट्रोलच्या दरात प्रति लिटर २.०९ रुपयांची वाढ झाली आहे. पुणे, मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरात मध्यरात्रीपासून नवे दर लागू करण्यात आले आहे. यापुढे प्रिमियम पेट्रोल भरणाऱ्यांना दोन रूपये अतिरिक्त मोजावे लागणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी गॅस सिलिंडरच्या किंमती वाढल्याच, त्यात गॅस तुटवड्यामुळे सर्वसामान्य होरपळला गेला होता. त्यात आता पेट्रोलच्या किंमती वाढल्या आहेत. पेट्रोल आणि गॅस महागल्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढणार आहे. याचा थेट परिणाम भाजीपाला, दूध आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या (Essential Commodities) किमतींवर होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे महागाईचा दुहेरी फटका बसू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Price: मुंबईत पेट्रोल ५ रुपये स्वस्त दराने मिळणार; मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी

ST NCMC Card: एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! महिला, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक

अंबाबाईला अडीच कोटींचा सोन्याचा कळस, दीड किलो सोन्याचा कळस अंबाबाईच्या चरणी

Zp Scam: जिल्हा परिषदेत बोगस बिलांचा घोटाळा, CEOच्या बंगल्याला 25 लाखांची लाईटिंग

तुकाराम मुंढेंचा ऑपरेशन गुटखा’ यशस्वी! 350 जणांना अटक, 274 दुकाने सील, राज्यभर खळबळ

SCROLL FOR NEXT