Mumbai Crime News  SAAM TV
मुंबई/पुणे

Mumbai Crime News : मुंबई उडवून देण्याची पुन्हा धमकी; BMC नियंत्रण कक्षाला फोन आल्यानंतर खळबळ

Mumbai Police News : मुंबई महापालिकेच्या कंट्रोल रूमला फोन करून मुंबई उडवून देण्याची पुन्हा धमकी देण्यात आली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai Hoax Call News Update : मागील काही दिवसांपासून मुंबई उडवून देण्याच्या धमक्या वारंवार येत आहेत. अशाच प्रकारे मुंबई महापालिकेच्या कंट्रोल रूमला फोन करून मुंबई उडवून देण्याची पुन्हा धमकी देण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, धमकीचा कॉल करणाऱ्याला मुंबईच्या मालवणी पोलिसांनी अटक केली. नासिमूल हसन रफी उल हसन शेख असं अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. (Latest Marathi News)

मुंबईत दहशतवादी घुसल्याची अफवा

मुंबईजवळील (Mumbai News) मीरा रोड पोलिस नियंत्रण कक्षाला अज्ञात व्यक्तीने फोन करून मुंबईत दोन दहशतवादी घुसल्याचे सांगून त्यांचे फोन नंबर दिले.

या फोननंतर संपूर्ण सुरक्षा यंत्रणा कामाला लागली. फोन करणाऱ्या व्यक्तीने दिलेल्या क्रमांकावरून शोध घेतला असता त्यातील एक क्रमांक दहिसरचा असल्याचे समोर आले. याची माहिती मीरा भाईंदर पोलिसांनी मुंबई नियंत्रण कक्षाला दिली. पोलिसांनी तात्काळ दहिसर व गुन्हे शाखेच्या पोलिसांना या व्यक्तींचा शोध घेण्यास सांगितले.

पोलिसांनी दोघांपैकी एकाचा शोध घेतला असता, ती महिला असल्याचे उघड झाले. अधिक तपास केला असता ती महिला वेश्याव्यवसाय करत असून, ग्राहकासोबत झालेल्या वादातून कुणीतरी हा खोडसाळपणा केल्याचे तिने सांगितले. आरोपीच्या या एका फोनमुळे मीरा-भाईंदर व मुंबई पोलीस दलात खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan : बाप की हैवान? कौटुंबिक वादातून अडीच वर्षाच्या मुलीचा चिरला गळा; कल्याणमधील संतापजनक घटना

Maharashtra News Live Update: संशयित आरोपी शफी शेख याला नाशिकरोड कारागृहात मारहाण

दिल्ली विमानतळावर भीषण दुर्घटना; दोन विमानांची पंख एकमेकांना धडकली

Female Behaviour After Breakup: सोशल मीडिया 'स्टॉकिंग' ते शॉपिंग; ब्रेकअपनंतर मुली नेमकं काय काय करतात?

Nagpur Summer Tourism: नागपूरजवळची 'ही' थंड हवेची ठिकाणं माहितीयेत का? उन्हाळ्याच्या सुट्टीत एकदा पाहाच...

SCROLL FOR NEXT