पिगासस फोन टँपिंग प्रकारणी संजय राऊतांचा केंद्रावर निशाणा  saam tv
मुंबई/पुणे

पिगासस फोन टँपिंग प्रकारणी संजय राऊतांचा केंद्रावर निशाणा

पत्रकारांचे फोन टँपिंग करणे हे देशाच सरकार कमजोर असल्याचं लक्षण

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : पत्रकारांचे फोन टँपिंग गंभीर बाब असून पिगासस फोन टँपिंग प्रकरण (Pegasus phone tapping case) संसदेत अधिवेशनात आज उपस्थित करणार असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले आहे. पत्रकारांचे फोन टँपिंग करणे हे देशाच सरकार कमजोर असल्याच लक्षण आहे, कुणीही येत आमचे फोन टॅप करतं, हे खुलेआम सुरु आहे, हा देशाच्या सुरक्षेसाठी धोका आहे. देशात भीतीच वातावरण आहे. अशा शब्दात संजय राऊत यांनी केंद्रसरकारवर टिका आहे. (Sanjay Raut targeted at Pegasus phone tapping case)

महाराष्ट्रात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi0 सरकार बनताना आमचे फोन टॅप झाले, अर्थात ते राज्यातील झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समोर यावे आणि फोन टँपिंग याविषयी उत्तर द्यावे. असेही यावेळी संजय राऊत यांना स्पष्ट केले. त्याचबरोबर त्यांनी यावेळी शेतकरी आंदोलनाविषयीदेखील विरोधकांवर निशाणा साधला आहे. शेतकरी हक्कांसाठी आंदोलन करताहेत. पण, अंध भक्त म्हणताहेत ते देशविरोधी आहेत. जर शेतकरी देशविरोधी असतील तर शेतकऱ्यांनी पिकवलेले अन्न अंध मोदीभक्तांनी खाऊ नये, अशा शब्दात त्यांनी संजय राऊत यांनी विरोधकांना टोलाही लगावला आहे.

वाचा, काय आहे पिगासस फोन टँपिंग प्रकरण

भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी काही दिवसांपुर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काही स्वयंसेवक, न्यायाधीश, काही केंद्रीय मंत्री आणि काही पत्रकारांचे फोन टॅप (Phone Tapping) केले जात असल्याचा दावा केला होता. यामुळे देशाच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली होती. धक्कादायक म्हणजे या प्रकरणी देशातील मोठमोठ्या वृत्तसंस्थांच्या 40 हून अधिक पत्रकारांचे फोनही टॅप केल्याची माहिती समोर आली आहे. या फोन टॅपिंगसाठी पिगासस स्पायवेअरचा (Pegasus spyware) वापर करण्यात आल्याचे समोर आहे.

पिगासस हे इस्त्रायली कंपनीने बनविलेले एक हॅकिंगचे सॉफ्टवेअर आहे. पिगासस बनवलेल्या इस्त्रायली कंपनी एनएसओने दिलेल्या माहितीनुसार या सॉफ्टवेअरचा वापर फक्त सरकारी कामांसाठी म्हणजेच दहशवादी कारवांयांचा शोध घेण्यासाठी केला जातो. पिगासस प्रोजेक्टच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, या यादीत 10 भारतीयांचे फोन नंबर पिगाससकडून हॅक करण्याचा प्रयत्न झाला. यात एका वृत्तसंस्थेच्या बातमीदार रोहिनी सिंग यांचा नंबर लीक झाला आहे. तर रोहिनी सिंग यांच्याव्यतिरिक्त आणखी दोन पत्रकारांचे नंबरही लीक झाल्याचे या यादीतून दिसून आले आहे.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Accident : मुंबई हादरली! आधी महिलेवर अत्याचार केला, नंतर गळा आवळून संपवलं

MHADA Lottery: म्हाडाची ५३५४ घरं आणि ७७ भूखंडांच्या विक्रीसाठी लॉटरी कधी निघणार? वाचा वेळापत्रक

Heart Attack: तरुणांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण का वाढलंय? काय आहेत कारणे?

Maharashtra Live News Update: सरकार चालढकल करतेय; माणिकराव ठाकरे यांचा आरोप

Pune Accident : डान्सर गौतमी पाटीलच्या कारचा अपघात, मुंबई-बेंगळूरू महामार्गावर घडली दुर्घटना

SCROLL FOR NEXT