पिंपरी चिंचवड: ACB च्या जाळ्यात अडकलेले भाजपचे स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे (Nitin Landage) यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. लाच स्वीकारणाऱ्या स्वीय सहायकाने स्थायिक समितीच्या 16 सदस्यांना देण्यासासाठी पैसे घेतल्याची कबुली दिली आहे. काल धाड टाकल्या नंतर ACB ने लाचेच्या रकमेसह महापालिका कार्यालयातूनच 7 लाख रुपयांची रोकड हस्तगत केली होती. नितीन लांडगेच्या घराचीही झडती घेतली आहे.
लांडगे यांना 4 दिवसाची पोलीस कोठडी मिळावी म्हणून ACB चा न्यायल्याकडे अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने नितीन लांडगे आणि इतर 4 आरोपींना फक्त 2 दिवसाची पोलिस कोठडी ठोठावली आहे.
दरम्यान, लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी पिंपरी-चिंचवड महानगर (PCMC) पालिकेत काल धाड टाकत सत्ताधारी भाजपचे (BJP) स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगेंसह इतर तीन जणांना अटक केली होती. लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एका ठेकेदाराला वर्क ऑर्डर काढून देण्यासाठी कमिशन म्हणून 9 लाख रुपयांची लाच मागितली होती आणि त्याचा पहिला हप्ता म्हणून 2 लाखांची रक्कम स्वीकारताना लांडगे यांचे स्वीयसहायक पिंगळे यांना पकडल्या गेले. आता सत्ताधारी भाजपचा पदाधिकारीच अटक झाल्यावर विरोधकांनी तोंडसुख घेतलं नसत तरच नवलच झालं असतं.
Edited By: Pravin Dhamale
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.