सरकारी कार्यालयातच महिला कर्मचाऱ्याला अधिकाऱ्याकडून जबर मारहाण

महिला कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण. पीडितेची राहणीमानावरून गेल्या 3 वर्षांपासून करतोय छेडछाड..
सरकारी कार्यालयातच महिला कर्मचाऱ्याला अधिकाऱ्याकडून मारहाण
सरकारी कार्यालयातच महिला कर्मचाऱ्याला अधिकाऱ्याकडून मारहाणSaam TV
Published On

बीड येथील राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयातील एका महिला कर्मचाऱ्याला, अधिकाऱ्याने छेडछाड करीत कार्यालयातच मारहाण केल्याची घटना, 14 ऑगस्ट रोजी घडली होती. घाबरलेल्या महिलेने याबाबत विभागीय नियंत्रकांकडे लेखी तक्रार केली आहे. या अगोदरही पीडित कर्मचाऱ्याला या अधिकाऱ्याकडून वारंवार छेडछाड होत असल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

तसेच वाईट हेतूने पहात असल्याचे देखील पीडित कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. हइ सांगत असतांना पीडिता ढसढसा रडली. या प्रकाराने एसटी महामंडळात खळबळ उडाली असून या बाबत अधिकाऱ्याला फोनवरुन संपर्क केला असता होऊ शकला नाही. विभागीय कार्यालयात महिला कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यापूर्वीही साधारण दोन वर्षांपूर्वी एका अधिकाऱ्याने आपल्याच विभागातील महिला कर्मचाऱ्याची छेडछाड करत शरिर सुखाची मागणी केली होती. याची तक्रार केल्यानंतर दक्षता समितीने चौकशी केली. यात दोषी आढळल्याने संबंधित अधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हाही दाखल झाला होता.

सरकारी कार्यालयातच महिला कर्मचाऱ्याला अधिकाऱ्याकडून मारहाण
तस्करी प्रकरणात 3 केनियन नागरिकांना अटक; गुप्तांगात लपवले होते सोने

ही घटना विसरण्यापूर्वीच आता लेखा विभागात नवीन घटना घडली आहे. अविवाहित महिला कर्मचारी काम करत असताना तिला प्रभारी लेखापाल नारायण मुंडे यांनी वाईट हेतून स्पर्श केला. यावर ती रागावून वरिष्ठांकडे तक्रार देण्यास जाताना तिला पायऱ्यांवर अडवून मुंडे यांनी मारहाण केली. तसेच नौकरी घालविण्याची धमकी दिल्याचा उल्लेख तक्रारीत आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com