पुणेकरांसाठी खुशखबर! डिसेंबर अखेर पीसीएमसी ते फुगेवाडी मेट्रो धावणार Saam Tv
मुंबई/पुणे

पुणेकरांसाठी खुशखबर! डिसेंबर अखेर पीसीएमसी ते फुगेवाडी मेट्रो धावणार

पुणे मेट्रो प्रकल्पाच्या पिंपरी ते फुगेवाडी या प्राधान्य मार्गावर डिसेंबर २०२१ पर्यंत मेट्रो आता धावणार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : पुणे मेट्रो Pune Metro प्रकल्पाच्या पिंपरी ते फुगेवाडी या प्राधान्य मार्गावर डिसेंबर २०२१ पर्यंत मेट्रो आता धावणार आहे. ७ किलोमीटर दरम्यान ५ स्टेशन आहेत. पीसीएमसी PCMC ते फुगेवाडी Phugewadi मार्गावर भोसरी वगळता सर्व मेट्रो स्टेशनचे Metro station काम हे प्रगतीपथावर असल्याची माहिती महामेट्रोचे Mahametro कार्यकारी संचालक अतुल गाडगीळ यांनी दिली आहे.

हे देखील पहा-

प्राधान्य मार्गावरती पिंपरी- चिंचवड, संत तुकारामनगर, भोसरी नाशिक फाटा, कासारवाडी आणि फुगेवाडी या ५ स्टेशनचा समावेश करण्यात आला आहे. पुणे मेट्रोचे काम पुढील डिसेंबर २०२२ म्हणजेच १३ महिन्यात पूर्ण होणार आहे. डिसेंबर २०२२ पर्यत काम पूर्ण होऊन, मेट्रो पूर्ण क्षमतेप्रमाणे सुरु करण्यात येणार असल्याची विश्वास महामेट्रोकडून व्यक्त करण्यात आला आहे. पुणे मेट्रोचे २ कॉरिडॉरमध्ये विभागणी करण्यात आली आहे.

यामध्ये ३० स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. पुणे मेट्रोची एकूण लांबी ३३.१ किमी राहणार आहे. पिंपरी चिंचवड ते स्वारगेट Swargate या कॉरिडॉर एकची लांबी १७.४ कमी आहे. यामध्ये शिवाजीनगर ते स्वारगेट हा ६ किमीचा भुयारी मार्ग राहणार आहे. तर वानाज Wanaj ते रामवाडी Ramwadi या कॉरिडॉर दोनची लांबी १५ किमी असणार आहे.

आतापर्यंत ६५ टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे. लवकरच प्रवाशांसाठी प्राधान्य विभाग कार्यन्वित करण्यात येणार आहेत. संत तुकाराम नगर ते फुगेवाडी आणि वनाज ते गरवारे महाविद्यालय Garware College हे प्राधान्य विभाग मार्ग असणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मतदानाच्या आदल्यादिवशी EVMमध्ये छेडछाड? शिंदे सेनेच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ

Eyebrow Shaping Tips: घरच्या घरी करा परफेक्ट आयब्रो! पार्लरशिवाय सुंदर शेप मिळवण्यासाठी 2 सोप्या ट्रिक्स

Maharashtra Politics: शिंदेसेनेला मुंबईत फक्त 56 जागा? भाजपनं केली शिंदेसेनेची कोंडी?

Maharashtra Live News Update: कणकवली घोणसरीत मादी बिबट्याला केले जेरबंद

ठाकरेचं ठरलं, जागांवर अडलं? युतीच्या घोषणेला जागावाटपाचा अडसर?

SCROLL FOR NEXT