पुराचा फटका बसलेल्या महाड मधील प्राण्यांना 'पॉज'ची मदत  प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

पुराचा फटका बसलेल्या महाड मधील प्राण्यांना 'पॉज'ची मदत

डोंबिवलीतील पॉज संस्थेचे कार्यकर्ते महाड या ठिकाणी मदतकार्य करत आहेत. आजारी प्राण्यांना औषधोपचार देत आहे. प्राण्यांसाठी वेगवेगळ्या भागात शिबीरं लावण्यात आले आहेत.

प्रदीप भणगे

डोंबिवली - नुकत्याच आलेल्या पुरामध्ये कोकणातील (kokan flood) अनेक प्राण्यांचं निधन झालं आहे. मुसळधार पावसाने कित्येक गावे पाण्याखाली गेली आहेत. शहरातील विस्थापित नागरिकांना आश्रय देण्यासाठी मदतकेंद्र (help centers) उभे करण्यात आले आहेत. महाडधील पुराचे (mahad flood) पाणी आता ओसरु लागले आहे. मात्र पुराच्या पाण्याचा फटका नागरीकांसह तेथील प्राण्यांनाही बसला आहे. महाराष्ट्र हे शेतीप्रधान राज्य आहे, त्यामुळे येथील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या गुरांना सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे. यात बहुतांश प्राण्यांना गॅस्ट्रोची लागण असण्याची शक्यता असते. असे पॉज म्हणजेच 'प्लांट अँड ॲनिमल्स वेल्फेअर सोसायटी'चे (Plants and Animals Welfare Society -PAWS) संस्थापक निलेश भणगे यांनी सांगितले आहे. (PAWS help flood victims animals in mahad)

हे देखील पहा -

महाडमध्ये सरकारी यंत्रणा, आर्मी, सामाजिक संघटना मदत करत आहेत. पुराचा फटका येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. त्याचप्रमाणे येथील पशू - पक्ष्यांनाही बसला आहे. त्यामुळे जेव्हापासून पूराचं पाणी ओसारायला लागलं आहे. तेव्हापासून महाड, पाली, लोनेरे, माणगाव आणि इतर शहरातील संस्था या ठिकाणी कार्यरत आहेत. प्राण्यांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था महाडमध्ये सध्या औषधांचा साठा पुरवत आहेत.

डोंबिवलीतील (dombivali) पॉझ संस्थेचे कार्यकर्ते महाड या ठिकाणी मदतकार्य करत आहेत. आजारी प्राण्यांना औषधोपचार देत आहे. प्राण्यांना वेळेवर उपचार मिळावे त्यासाठी वेगवेगळ्या भागात शिबीरं लावण्यात आले आहेत. प्राण्यांच्या मदतीसाठी मुंबई, डोंबिवली तसंच कल्याण परिसरातील प्राणी मित्रांकडून (animal lovers) मदत मिळवली जात आहेत. यात 300 किलो डॉग फूड, ५० किलो कॅट फूड, घोड्यांचे खाद्य तारपेलिन शिट्स, प्राथमिक उपचारांसाठी लागणारे साहित्य म्हणजेच डेटॉल, अडीच किलो हळद, बेटादिन, कॉटन, सलाईन आणि इतर लागणारी औषधे जमा करून गेल्या आठवड्यापासून पाठवण्यास सुरूवात करण्यात आली आहे. सोमवारी, बाकी संस्थेकडून पुन्हा एकदा साहित्य आणि औषधांचा साठा पाठवण्यात आला आहे. तसेच, पॉज संस्थेने दुसऱ्यांदा औषधांचा साठा पुरवला आहे. तर, गुरुवारी पुन्हा एकदा औषधांचा साठा महाडमध्ये पाठवण्यात येणार असल्याची माहिती निलेश भणगे यांनी दिली आहे.

ह्या काळात भटक्या प्राण्यांमुळे कोणतीही रोगराई पसरू नये म्हणून ह्या वेळी पॉज तर्फे सेवन इन वन चे लसीकरण करण्यात आले असून पहिल्या दिवशी 150 भटक्या कुत्र्यांना लस दिली गेली आहे. तसेच ठिक ठिकाणी रेबीज लसीकरण करण्यात आल्याचे संस्थेचे टीम मेंबर प्रशांत बुन्नावार ह्यांनी सांगितले. 2004 च्या सुनामी पासून ते नेपाळ मधील भूकंप, कुर्ग येथील पूर ते आता महाड मधील पूर, जेव्हा नैसर्गिक किंवा मानव निर्मित आपत्ती असेल तेव्हा तेव्हा पॉज संस्थे तर्फे आपत्ती निवारण केले जाते असे संस्थेच्या ट्रस्टी अनुराधा रामस्वामी ह्यांनी सांगितले.

Edited By - Akshay Basiane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'एक है तो अदानी सेफ है'; राहुल गांधींचा मोदी-शाहांवर हल्लाबोल

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

SCROLL FOR NEXT