dharashiv news  Saam tv
मुंबई/पुणे

पवनराजे निबांळकर हत्या प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी उचललं महत्वाचं पाऊल, काय निर्णय घेतला?

pawanraje nimbalkar News : पवनराजे निबांळकर हत्या प्रकरणातील आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आलीये. या निकालानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी महत्वाचं पाऊल उचललं आहे.

Vishal Gangurde

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला

पवनराजे हत्या प्रकरणात आरोपींची निर्दोष मुक्तता

हत्या प्रकरणाच्या निकालावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचं महत्वाचं पाऊल,

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात कोर्टाने पुराव्याअभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे. २० वर्षांपासून सुरू असलेल्या खटल्यात पद्मसिंह पाटील यांच्यासहित कोर्टाकडून सर्वांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या प्रकरणाचा निकाल विरोधात गेल्याने धाराशिव बंद पुकारण्यात आलाय. या प्रकरणाच्या निकालानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी महत्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात विशेष न्यायालयाने दिलेल्या निर्दोष मुक्तीच्या निकालाविरोधात केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) वरिष्ठ न्यायालयात अपील करणार आहे. या निकालानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केली. या चर्चेनंतर अमित शाह यांनी सीबीआयच्या निकालाविरोधात वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

निकालानंतर ओमराजे समर्थक आक्रमक

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल विरोधात गेल्याने ओमराजे समर्थकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ओमराजे निंबाळकर यांच्या कार्यकर्त्यांकडून बंद करायला सुरुवात झाली आहे. तर निकाल विरोधात गेल्याने धाराशिवमधील दुकान बंद करण्यास कार्यकर्त्यांनी सुरुवात केली आहे.

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणानंतर ओमराजे निंबाळकर यांच्या समर्थकांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणावर भाष्य करताना ओमराजेंच्या समर्थकांनी म्हटलं की, पद्मसिंह पाटील यांचे राजकीय वर्चस्व होतं, त्यांनीच पुराव्यात फेरफार केली असेल. सर्व आरोपी निर्दोष तर मग हत्या केली कुणी? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तर निकाल विरोधात गेल्याने कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत धाराशिवमधील काही कार्यालये बंद केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT