sinhgad express, deccan queen , passengers
sinhgad express, deccan queen , passengers  saam tv
मुंबई/पुणे

सिंहगड एक्सप्रेस, डेक्कन क्विनची 'ही' अडचण दूर करा : प्रवासी संघाची मागणी

दिलीप कांबळे

Maval : मध्य रेल्वेच्या (central railway) मुंबई पुणे मार्गावर धावणाऱ्या सिंहगड एक्सप्रेस (sinhagad express) व डेक्कन क्वीन (deccan queen) या गाड्याचे जनरल डब्बे कमी करण्यात आल्याने या गाड्यांमधून दैनंदिन मुंबई पुणे प्रवास करणारे कामगार आणि व्यावसायिक प्रवाश्यांचे हाल होत आहेत. या गाड्यांच्या बोगींची संख्या वाढवून डबे पूर्ववत करण्यात यावेत, अशी मागणी रेल्वे प्रवासी संघाकडून मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांकडे करण्यात आली आहे.

रेल्वे प्रवासी संघटना पिंपरी चिंचवड (pimpri chinchwad) यांच्यातर्फे संघटनेचे अध्यक्ष इकबाल मुलाणी यांनी मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांना याबाबत निवेदन दिले आहे. डेक्कन क्वीन व सिंहगड एक्सप्रेस एलएचबी कोचसह नव्या स्वरुपात सुरू केल्या आहेत. मात्र, या दोन्ही गाड्यांचे जनरल डबे कमी केल्यामुळे अनारक्षित तिकीटधारकांची मोठी गैरसोय होत आहे.

डेक्कन क्वीनला एकच जनरल डबा असल्यामुळे या डब्यामध्ये उभे रहाणेही मुश्कील होते. त्यामुळे तिकीटधारकांना आरक्षित डब्यांमधून प्रवास करावा लागतो. त्यामुळे आरक्षित तिकीटधारकांना याचा त्रास सहन करावा लागतो. यातून प्रवाशांमध्ये वाद होतात असे निवेदनात म्हटलं आहे.

सध्याची ही गाडी 14 डब्यांची असून दोन जनरल डबे कमी केले आहेत. डेक्कन क्वीन एक्सप्रेसची एक जनरल बोगी कमी केली आहे. या दोन्ही गाड्या प्रामुख्याने दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी आहेत. या दोन्ही गाड्यांना जनरल डबे (बोगी) कमी केल्यामुळे, अनारक्षित तसेच आरक्षित तिकीट धारकांचा प्रवास अतिशय त्रासदायक होत आहे. ते टाळण्यासाठी या दोन्ही गाड्यांना पूर्वीप्रमाणे डेक्कन क्वीन एक्सप्रेसला एक जनरल डबा आणि सिंहगड एक्सप्रेसला दोन जनरल डबे जोडावेत अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RTE Fees : 'आरटीई'च्या थकीत रक्कमेबाबत खंडपीठाकडून राज्य सरकारला विचारणा

True Love Test : तुमच्या पार्टनरचं तुमच्यावर खरं प्रेम आहे की खोटं? 'या' हिंटने होईल स्पष्ट

Arvind Kejriwal: सुटका केल्यास काम करु शकत नाही... सुप्रीम कोर्टाचे अरविंद केजरीवाल यांच्याबाबत महत्वाचे विधान

Sayali Sanjeev: सायलीचं साडीतलं मराठमोळं सौंदर्य मनात भरलं

Live Breaking News : पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी PM मोदी घेणार अंबाजोगाईत सभा, तयारी पूर्ण

SCROLL FOR NEXT