Mumbai Local Train Train Mega Block
मुंबई/पुणे

Mumbai Local Train: प्रवासी मित्रांनो लक्ष द्या! मध्य रेल्वे, हर्बर लाईनवरील वाहतूक राहणार बंद; दोन्ही मार्गावर मेगा ब्लॉक

Mumbai Local Train Block: मध्य रेल्वे आणि हार्बर लाईनवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Bharat Jadhav

लोकल रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनो लक्ष द्या! तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. रविवारी मुंबईतील मध्य रेल्वे आणि हर्बर लाईनवरील लोकल रेल्वे वाहतूक सेवा बंद राहणार आहे. सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. हॉबर मार्गावरदेखील मेगा ब्लॉक असणार आहे. ठाणे आणि वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत बंद असणार आहे.

सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील. त्या शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील आणि नंतर मुलुंड स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर पुन्हा वळवल्या जातील आणि नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.

मध्य रेल्वे रविवार दिनांक ०६.०४.२०२५ रोजी उपनगरीय विभागांवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक करणार आहे. ठाणे येथून सकाळी ११.०७ ते दुपारी ३.५१ वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा मुलुंड येथे अप जलद मार्गावर वळवल्या जातील. मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव येथे थांबतील.

त्या गाड्या माटुंगा स्थानकावर अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील आणि १५ मिनिटे उशिराने पोहोचतील. हे मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, अशी विनंती रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ११.०० ते सायंकाळी ५.०० पर्यंत सुटणाऱ्या/येणाऱ्या सर्व अप आणि डाऊन गाड्या नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.

ठाणे आणि वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत

ब्लॉक कालावधीत वाशी/नेरुळ आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

ठाणे येथून सकाळी १०.३५ ते दुपारी ४.०७ वाजेपर्यंत सुटणाऱ्या वाशी/नेरुळ/पनवेलसाठी डाऊन मार्गावरील सेवा आणि

पनवेल/नेरुळ/वाशी येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ४.०९ वाजेपर्यंत ठाणेसाठी सुटणाऱ्या अप मार्गावरील सेवा रद्द राहतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live: आदेश आला तर मंत्रीपद सोडण्याची तयारी- भरत गोगावले

Ranjangaon : साडेतीन महिन्यांनंतर रांजणगाव महागणपती मंदिर भाविकांसाठी खुले; दर्शनासाठी मोठी गर्दी

लाडक्या लेकीसाठी बनवा सोन्याची चैन, या 5 डिझाईन्स सध्या ट्रेंडमध्ये

Anti Paper Leak Law: सर्वात मोठी बातमी! परीक्षा सुधारणा विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी; पेपरफुटीप्रकरणी दोषींना ३ महिन्यांच्या आत होणार शिक्षा

अभिजीत दिपकेंची प्रकृती बिघडली; भेटीगाठी घेत असतानाच घाईघाईनं घरात गेले, तातडीने डॉक्टर पोहोचले

SCROLL FOR NEXT