डोंबिवली पश्चिमेला ओपन टेरेसचा भाग कोसळला... प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

डोंबिवली पश्चिमेला ओपन टेरेसचा भाग कोसळला...

डोंबिवली पश्चिमेमधील श्रीधर म्हात्रे मधील त्रिभुवन ज्योत सोसायटी येथे चौथ्या मजल्यावरील कॅन्टीलीव्हर म्हणजे ओपन टेरेसचा भाग कोसळला.

प्रदीप भणगे

डोंबिवली: डोंबिवली पश्चिमेमधील श्रीधर म्हात्रे मधील त्रिभुवन ज्योत सोसायटी येथे चौथ्या मजल्यावरील कॅन्टीलीव्हर म्हणजे ओपन टेरेसचा भाग कोसळला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. सदर घरातील कुटुंबाने घर खाली केले असून घटनास्थळी महापालिका आणि फायरब्रिगेडच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. (Part of the open terrace has collapsed in Dombivli west)

हे देखील पहा -

त्रिभुवन ज्योत सोसायटी ही बिल्डिंग 28 वर्ष जूनी आहे. याबाबत महापालिकाचे ह प्रभागक्षेत्र अधिकारी सुहास गुप्ते याना विचारले असता त्यांनी सांगितले की, ह्या घटनेमुळे त्यांच्या इमारतीला आज महापालिकेकडून 265 ए कलमानुसार महापालिकेच्या पॅनल वरील स्ट्रक्चरल ऑडिटरकडून स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याची नोटीस देण्यात आली आहे. तसेच ज्या ठिकाणचा स्लॅब पडलेला आहे, तेथील आणि खालच्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होणे बाबत सूचना दिल्या आहेत.

या इमारतीचे 24 तासात स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट प्राप्त झाल्यावर त्यांनी ऑडिट रिपोर्टनुसार आवश्यक निर्णय घेऊन इमारत दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी करण्याबाबत ठरवायचे आहे अशा त्यांना सूचना देण्यात आले आहेत असे अधिकारी गुप्ते यांनी सांगितले. सदर घटनेमुळे कल्याण-डोंबिवली मधील धोकादायक इमारतीचा प्रश्न पुन्हा एकदा पुढे आला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महापालिकेसाठी दिल्लीत 'पॉवर' गेम? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार?

Kanda Batata Rassa Bhaji Recipe: झणझणीत कांदा बटाटा रस्सा भाजी कशी बनवायची?

तपोवन शेजारी शेकडो वृक्षांचा कत्तलेआम, वृक्ष आणि विरोधावर सरकारची कु-हाड

Zila Parishad-Corporation Election: जिल्हा परिषदेसह महापालिकेच्या निवडणुका कधी होणार? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितली तारीख

Maharashtra Live News Update: हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील बर्गेवाडी मध्ये भीषण आग

SCROLL FOR NEXT