चंद्रकांतदादाच सोमय्यांचे मास्टरमाइंड : हसन मुश्रीफ

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी 100 कोटींच्या घोटाळ्याच्या केलेल्या आरोपानंतर आता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेत सोमय्या यांचे सगळे आरोप फेटाळले
चंद्रकांतदादाच सोमय्यांचे मास्टरमाइंड : हसन मुश्रीफ
चंद्रकांतदादाच सोमय्यांचे मास्टरमाइंड : हसन मुश्रीफSaam Tv
Published On

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी 100 कोटींच्या घोटाळ्याच्या केलेल्या आरोपानंतर आता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेत सोमय्या यांचे सगळे आरोप फेटाळले आहेत. महाविकास आघाडी सरकार मधील मंत्र्यांवर आरोपांची मालिका सुरु करणाऱ्या माजी खासदार किरीट सोमय्या यांना कोल्हापूर दौऱ्यावर पोलिसांनी बंदी घातली आहे. यामुळे किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारवर परत जोरदार गंभीर आरोप केले आहेत. हसन मुश्रीफ यांचा घोटाळा उघड केल्यानंतर आता आपण विदर्भातील नेत्याचा घोटाळा बाहेर काढणार होतो.

शरद पवार यांना हे कळल्यामुळेच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगून माझा कोल्हापूर दौरा प्रतिबंधित केला असल्याचा आरोप त्यांनी केला होता. सर्व कार्यकर्त्यांनी थोडा संयम बाळगावा हसन मुश्रीफ यांनी आवाहन केले आहे. किरीट सोमय्या यांची स्टंटबाजी कशाला? हा अधिकार कोणी दिला. हसन मुश्रीफ यांचा सवाल कोल्हापूर जिल्ह्यात भाजप स्थान झिरो आहे. भाजप दिल्लीत चंद्रकांत पाटील बदलणार ठरलं होतं पण अमित शाहमुळे थांबला. सुफड साफ झाला, म्हणून हसन मुश्रीफ मागे आहेत. किरीट सोमय्या म्हणाले, मी फडणवीस सांगतात तस करतो, चंद्रकांत पाटील पुरुषार्थ दाखवून लढावं माझा कुटुंबाचे नाव आरोप घेऊ नये.

हे देखील पहा-

100 कोटी नुकसान अब्रू नुकसानीचा दावा मी करणार आहे. आज माझ्यावर केलेला आरोप बिनबुडाचा खोटा आहे. किरीट सोमय्या खरी पदवी आहे का? आजचा आरोप पुन्हा अभ्यास करा. मी सीए पाठवतो जे आरोप करण्यात आले आहेत. ​त्याबाबत माफी मागितली पाहिजे. नलावडे कारखाना 100 कोटी घोटाळा ब्रिक्स कंपनी माझा आणि जावयाचा सुतराम संबंध नाही. ब्रिक्स इंडिया कंपनी 44 लाख शेअर कॅपिटल आहे. ही शेअर कंपनी नाही. 100 कोटी घोटाळा कसा होईल, कोल्हापूर बँकेने निविदा काढली नाही. कर्ज काढलं नव्हते.

हा कारखाना शासनाने सहयोगी तटावर कारखाना चालवायला दिला होता. 43 कोटीला कारखाने घेतले परंतु, तोटा वाढला यामुळे कारखाना सोडला हाय कोर्टात गेले होते. 2012- 13 ला 10 वर्षात देखील शासनाकडून कारखाना घेतला. 2020 ला तोटा होत म्हणून नुकसान सोसून संचालक मंडळाच्या ताब्यात दिला. कारखान्यात 18 महिने पगार थकले होते. त्या कंपनीचा माझ्याशी संबंधित आहे. जिल्हा बँकेने बिडिंग केलं नाही. कामोनी शेअर कंपनी नाही. ब्रिक्स कंपनी 75 कोटी तोटा आहे. किरीट सोमय्या यांनी भरून द्यावा. आणि त्यांनी थोडा नितीन गडकरी याचे मार्गदर्शन घेतलं पाहिजे.

चंद्रकांतदादाच सोमय्यांचे मास्टरमाइंड : हसन मुश्रीफ
Rain : आज काही भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता...

स्फूर्ती कारखाना बाबत त्यांनी मार्गदर्शन केले असते. 100 कोटी आधी आणि आज 50 कोटी आता दावा ठोकणार आहेत. तुम्ही पर्यटन कशाला करायला जात? घोटाळेबाज तुरुंगात टाकणार? तक्रार करा, तुम्ही सुपारी दिली. तुम्ही न्यायाधीश झाले, का मी 17 वर्ष आहे. माझ्यावर आरोप झाले नाही, दबक्या आवाजात चर्चा झाली की नाही. मी सामान्य माणसात काम केलं आहे. भाजप काळात जमीन चिक्की घोटाळा झालं. आमच्या नावावर घोटाळे नाही, मंगल प्रभात कागदपत्र भाजप हत्यारे म्हणून करतात.

सरकारला अस्थिर करायचे प्रयत्न पवार साहेब काय संबंध लायकी आहे का? उद्धव ठाकरे नाव घेतात उच्च न्यायलायत जावं लागेल, हे थांबावं. सरकारला मी सांगितलं आम्ही फेव्हीकोल आहोत. आम्ही सिमेंटसारखे ये क्यू नाही. दिवर तुटती आता याचपण प्रकरण बघावं लागेल. आता गप्प बसून चालणार नाही. हे मंत्रिमंडळ बैठकीत बोलले आहेत. जरंडेश्वर कारखाना अजित पवार आदर्श पद्धतीने नातेवाईकांना चालवला. या कारखान्यात 60 हजार लोकांनी पैसे दिले. 10 वर्षांपूर्वीची गोष्ट किरीट सोमय्या याना सांगीन तुम्हाला मुलं बाळ आहेत, असे वागवू नका आरोप करायचे आणि पर्यटनला जायचे. प्रशासनाने निर्णय घेतला असणार कायदा सुव्यवस्थेसताही प्रशासनाने निर्णय घेतला प्रशासनाने खबरदारी घेतली असणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com