Mumbai: अटक वारंट रद्द होण्यासाठी परमबीर सिंह आज चांदिवाल आयोगासमोर राहणार हजर Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai: अटक वारंट रद्द होण्यासाठी परमबीर सिंह आज चांदिवाल आयोगासमोर राहणार हजर

चांदिवाल आयोगात १०० कोटी वसूली प्रकरणी चौकशी सुरू आहे. या चौकशीला हजर राहण्यासाठी परमबीर सिंह यांना चार वेळा समन्स बजावले होते.

सुरज सावंत

मुंबई: मुंबईतल्या खंडणी आणि अँट्रोसिटी सारख्या गंभीर गुन्ह्यात फरार असलेले मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) आज चांदिवाल आयोगासमोर सकाळी ११ च्या सुमारास हजर राहणार आहेत. चांदिवाल आयोगात १०० कोटी वसूली प्रकरणी चौकशी (Inquiry) सुरू आहे. या चौकशीला हजर राहण्यासाठी परमबीर सिंह यांना चार वेळा समन्स (Summons) बजावले होते. दंडात्मक शिक्षाही सुनावली होती, मात्र ते हजर राहिले नव्हते. (Mumbai: Parambir Singh will appear before the Chandiwal Commission today for cancellation of arrest warrant)

हे देखील पहा -

अखेर परमबीर दोनच दिवसांपूर्वी मुंबईत उपस्थित राहून तपास यंत्रणाना सामोरे जाऊ लागल्यानंतर चांदिवाल आयोगाने परमबीर सिंह कुठे आहेत असे विचारले. मात्र वकिलाने आम्ही कळवतो असे म्हणताच आयोगाने आम्ही अजून जामीनपात्र अटक वारंट रद्द केलेला नसल्याची आठवणं करून देत परमबीर सिंह यांच्या त्याना सोमवारी हजर (Present) राहण्याबाबत वकिलांना खडसावले. हेच वारंट रद्द करण्यासाठी आणि आयोगाच्या चौकशीला सामोरे जाण्यासाठी परमबीर सिंह हे आज चांदिवाल आयोगासमोर हजर राहणार आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Goregaon Crime: इमारतीत शिरून मोबाईल चोरीचा प्रयत्न; ५ जणांकडून बेदम मारहाण, हाणामारीत तरुणाचा मृत्यू

Wednesday Horoscope : दिवाळी पाडव्याचा आनंद द्विगुणीत होणार; महत्वाची कामे दुपारनंतर करा, अन्यथा...

Maharashtra Live News Update: ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात परतीच्या पावसाचा धुमाकूळ

Mumbai Port Authority: सफाई कर्मचाऱ्यांच्या घरांचा प्रकल्प रखडला; ‘मुंबई पोर्ट’कडून परवानगीसाठी विनंती

Ratnagiri Tourism : प्राचीन वास्तुकला अन् रेखी‍व शिल्पे, रत्नागिरीत गेल्यावर 'ही' लेणी पाहायला नक्की जा

SCROLL FOR NEXT